Irrigation : लघु प्रकल्पात ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा

परभणी जिल्ह्यातील २२ पैकी ११ लघु प्रकल्पांत १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यंदा गुरुवार (ता. ६) पर्यंत सर्व लघु तलावांत सरासरी ३६.३०५ दलघमी म्हणजेच ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
Water Reservoir
Water ReservoirAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) २२ पैकी ११ लघु प्रकल्पांत १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा (Water Reservoir) उपलब्ध झाला आहे. यंदा गुरुवार (ता. ६) पर्यंत सर्व लघु तलावांत सरासरी ३६.३०५ दलघमी म्हणजेच ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लघुप्रकल्पात ११ टक्के कमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील करपरा आणि मासोळी (Karpara and Masori Water Reservoir) हे दोन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

Water Reservoir
Water Storage : घाटशिळ पारगाव वगळता जिल्ह्यातील धरणे ‘फुल्ल’

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात आजवर सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यंदा पाणलोटक्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे अनेक लघु प्रकल्प यंदा भरले नाहीत. जिल्ह्यातील २२ पैकी २ लघुप्रकल्पात २६ ते ५० टक्के, एका प्रकल्पात ५० ते ७५ टक्के १९ प्रकल्पांत ७५ ते १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

Water Reservoir
Water Project : नऊ वर्षांत तिसऱ्यांदा टेंभापुरी तुडुंब

पेडगाव (ता. परभणी) तलावात ४० टक्के, आंबेगाव (ता.मानवत) तलावात ३३ टक्के, पाणीसाठा आहे. अन्य तलावांमध्ये झरी (ता.पाथरी) ९७ टक्के, नखातवाडी (ता. सोनपेठ) ८१ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) ९५ टक्के, जोगवाडा (ता. जिंतूर) ८९ टक्के, भोसी (ता. जिंतूर) ८६ टक्के, कवड (ता. जिंतूर) ९४ टक्के, दहेगाव (ता. जिंतूर) ८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते.

त्यावेळी ऑक्टोंबच्या ६ तारखेला सर्व लघु प्रकल्पात सरासरी ९७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गतवर्षी २० लघु तलाव शंभर टक्के भरले होते. यंदा ११ तलावात शंभर टक्के पाणीसाठा आहे.

यंदा जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा मध्यम प्रकल्प आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणीआावर्तने मिळतील.

शंभर टक्के पाणीसाठा असलेले तलाव...

शंभर टक्के पाणीसाठा असलेल्या लघु तलावांमध्ये तांदूळवाडी (ता. पालम), राणीसावरगाव, टाकळवाडी, कोद्री, (सर्व ता. गंगाखेड), देवगाव, वडाळी, चिंचोली, आडगाव, केहाळ, मांडवी (सर्व ता. जिंतूर), पाडाळी या तलावाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com