Fertilizer Stock : रब्बीच्या पिकांसाठी ८८ हजार टन खते उपलब्ध

रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात झाली असून, आतापर्यंत कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी एक लाख ८५ हजार ९४० टन खतांची मागणी केली आहे.
Eleven thousand tons of fertilizer stock will be protected in Jalgaon district
Eleven thousand tons of fertilizer stock will be protected in Jalgaon district

पुणे : रब्बी हंगामातील (Rabi Season) पेरण्यांना सुरुवात झाली असून, आतापर्यंत कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी एक लाख ८५ हजार ९४० टन खतांची मागणी केली आहे. त्यापैकी खरिपातील ६० हजार ३०० टन खते शिल्लक असून, रब्बीसाठी एकूण ८८ हजार ५९३ टन खते (Fertilizer Stock) उपलब्ध असल्याने पेरणीसाठी अडचणी येणार नसल्याचा दावा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने (Agriculture Department)केला आहे.

Eleven thousand tons of fertilizer stock will be protected in Jalgaon district
Rabi Sowing : एक लाख ६३ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी

रब्बी हंगामात शेतकऱ्यांची गरजेनुसार जिल्हास्तरावरील मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे महिनानिहाय खताची मागणी केली आहे. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीसाठी कृषी विभागाने खतांची मागणी केली आहे. त्यापैकी ऑक्टोबर महिन्यातील २७ हजार ८९२ टन खते उपलब्ध करून दिले आहेत. एकूण शिल्लक असलेल्यांपैकी १७ हजार ७९२ टन खताची दुकानदारांकडून विक्री केली आहे.

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी दोन लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्र आहे. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामात कृषी विभागाने दोन लाख ४८ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र रब्बी ज्वारीचे आहे. रब्बी हंगाम सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार युरिया ३९ हजार १८७ टन, डीएपी २ हजार ८३, एमओपी २ हजार १८०, एनपीकेएस ३४ हजार ८०५, एसएसपी १० हजार २३६, कंपोस्ट १०१ टन खते उपलब्ध आहेत.

Eleven thousand tons of fertilizer stock will be protected in Jalgaon district
Rabi Crop Insurance : रब्बीसाठी पीकविमा योजना राज्यभर लागू

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने ७ नोव्हेंबरअखेर घेतलेल्या अहवालावरून जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांनी पॉस मशिनद्वारे १७ हजार ७९२ टन खताची विक्री केली असून, दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याची स्थिती आहे.

आमच्याकडील अहवालानुसार मोठ्या प्रमाणात खते शिल्लक आहेत. शेतकऱ्यांना खते घेण्यासाठी कृषी आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार पॉस मशिनवर नोंदणी बंधनकारक केली आहे. ही नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना खते मिळणार नाहीत. नोंदणी करूनही एखाद्या दुकांनामध्ये खते नसतील, तर कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

- सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com