केडगावात नवीन मुगाची ८९० क्विंटल आवक

केडगाव उपबाजारात ज्वारी, गहू (Wheat) व बाजरीची आवक स्थिर असून बाजारभावात वाढ आहे. कांद्याची (Onion) ६ हजार ८०० क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान ३०० रुपये; तर कमाल १८०० रुपये बाजारभाव मिळाला.
Green Gram
Green GramAgrowon

दौंड, जि. पुणेः अन्नधान्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील दौंड बाजार समितीच्या केडगाव उपबाजारात नवीन मुगाची (green gram) ८९० क्विंटल आवक झाली आहे. प्रतवारीनुसार किमान ५ हजार ते कमाल ७ हजार रुपये दर मिळाला. मागील आठवड्यात मुगाची १४५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ५ हजार ते कमाल ६ हजार ७०० रुपये दर होता. तो या आठवड्यात वाढला आहे.

जिल्‍ह्यात दौंड बाजार समितीमध्ये अन्नधान्य कडधान्याची (Pulses) मोठी आवक असते. केडगाव उपबाजारात ज्वारी, गहू (Wheat) व बाजरीची आवक स्थिर असून बाजारभावात वाढ आहे. कांद्याची (Onion) ६ हजार ८०० क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान ३०० रुपये; तर कमाल १८०० रुपये बाजारभाव मिळाला. लिंबाच्या १४४ डागांची आवक झाली असून, त्यास प्रतिडाग किमान ४०० तर कमाल १ हजार २७० रुपये असा बाजारभाव मिळाला.

फ्लॉवरची ५७० गोणी आवक होऊ त्यास प्रतिगोणी किमान २००; तर कमाल ५०० रुपये, कोथिंबिरीस शेकडा किमान ७०० रुपये तर कमाल १७०० आणि मेथीस शेकडा किमान ८०० व कमाल १५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

शेतमाल आवक (क्विंटलमध्ये) दर (रुपयांत)

गहू --- ४७२ --- २००० --- २७५०

ज्वारी --- २१६ --- १६७५ --- २८५१

बाजरी --- ४३१ --- २०५० -- २७५१

हरभरा -- ०९७ -- ३५०० -- ४५००

मका ०२९ -- २००० --- २६००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com