POCRA : ‘पोकरा’अंतर्गत डीबीटीद्वारे ९१ कोटींचे अनुदान जमा

परभणी जिल्ह्यातील स्थिती; ३० हजारांवर शेतकरी लाभार्थी
Agricultural Sanjeevani Project
Agricultural Sanjeevani ProjectAgrowon

परभणी ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) (POCRA) अंतर्गत विविध घटकांची कामे पूर्ण केलेल्या परभणी जिल्ह्यातील ३० हजार २०२ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) (DBT) प्रणालीद्वारे ९१ कोटी १ लाख ३२ हजार ५४० रुपये एवढी अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Agricultural Sanjeevani Project
POCRA Subsidy : ‘पोकरा’अंतर्गत ७९ कोटी ६३ लाखांवर अनुदान वितरित

पोकराअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये परभणी जिल्ह्यातील २७५ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांतील ६३ हजार ८४८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

त्यापैकी ६० हजार ७०० शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात आली. या शेतकऱ्यांनी विविध घटकांच्या लाभासाठी १ लाख ८३ हजार ९३ अर्ज केले आहेत.

मंजुरीच्या स्तरावर ६ हजारांवर अर्ज, स्थळ पाहणी स्तरावर १० हजारांवर अर्ज प्रलंबित आहेत. मोका तपासणी स्तरावर ४ हजार ७६७ अर्ज प्रलंबित आहेत.

आजवर एकूण ३० हजार २०२ लाभार्थींना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ९१ कोटी १ लाख ३२ हजार ५४० रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. मृद व जलसंधारणाची २७३ पैकी १०८ कामे पूर्ण झाली आहेत.

Agricultural Sanjeevani Project
POCRA : पोकरा’चा दुसरा टप्पा राबविणार

पोकराअंतर्गत लाभार्थी,
अनुदान रक्कम (कोटी रुपये)
घटक लाभार्थी शेतकरी संख्या अनुदान रक्कम
ठिबक सिंचन संच ३४५९ २३.९७

तुषार संच १५९०० २८.८६
फळबाग लागवड २२२६ ९.०४
वैयक्तिक शेततळे ६४ ०.७६
शेततळे अस्तरीकरण ९ ०.८

विहिरी १५७ २.६२
कृषी पंप ७९५ १.०६
पाइप १५८६ ३.११
शेडनेटगृह ८३ ८.०४

बीजोत्पादन ४५४५ ४.५६
कृषी यांत्रिकीकरण ५६४ ३.८९
कंपोस्ट खतनिर्मिती ४४ ०.३
शेतीशाळा यजमान शेतकरी ५५७ ०.१५
शेडनेट, पॉलिहाऊस साहित्य २० ०.१७

रेशीम शेती २६ ०.१५
मत्स्यपालन १० ०.१
शेळीपालन ९ ०.०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com