
Agriculture Electricity नांदेड : प्रलंबित शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाच्या (Irrigation) दृष्टीने प्राधान्याने वीजजोडणी (Power Connection) देण्याच्या हेतूने महावितरणने कंबर कसली आहे.
मार्चअखेर प्रलंबित असलेल्या कृषिपंपधारक (Agriculture Pump) शेतकऱ्यांना ताबडतोब वीजजोडणी देण्यासाठी नांदेड परिमंडळातील अधिकारी व कर्मचारी कामाला लागले असून, एप्रिल २०२२ पासून आजपर्यंत चार हजार ३८ शेतकऱ्यांना नवीन कृषिपंपाच्या वीज जोडण्या देण्यात आल्या असून, गेल्या १७ दिवसांत ९७२ वीजजोडण्या देत शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्णत्वास नेले आहे
नांदेड परिमंडळातील सर्व अधिकारी प्राधान्याने प्रलंबित वीजजोडण्या मार्च २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला लागले आहेत.
महाकृषी ऊर्जा अभियान २०२० च्या माध्यमातून वीजबिलांच्या वसुलीतून एकूण ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे.
हा निधी त्या त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे.
स्वतंत्र खात्यात जमा होणाऱ्या निधीतून नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण व उपकेंद्रातील विविध यंत्रणेचे पायाभूत सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
कृषिपंपांच्या वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती व सोबतच भरलेल्या वीजबिलांच्या ६६ टक्के निधीतून गावातील वीजयंत्रणेचा विकास या दुहेरी फायद्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, महावितरणची आर्थिक परिस्थिती पाहता थकबाकीदार वीजग्राहकांनी चालू वीजबिलांसह थकबाकी भरणे अत्यावश्यक बाब झालेली आहे.
इतर जीवनावश्यक गरजेप्रमाणेच विजेच्या बीलाचाही भरणा करावा. विलंब आकार आणि व्याजातील सूट दिल्यानंतर सुधारित थकबाकीनुसार ३० टक्के माफीचा लाभ घेण्यासाठी आता मार्च २०२३ अखेरपर्यंतचाच कालावधी शिल्लक राहिला, असल्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
तीन जिल्ह्यांतील वीजजोडणी स्थिती अशी...
कृषिपंप थकबाकीतून वसूल झालेल्या कृषी आकस्मिक निधीच्या माध्यमातून नांदेड परिमंडलातील ४ हजार ३८ शेतकऱ्यांना नवीन कृषिपंपाची वीजजोडणी देण्यात आली आहे.
यामध्ये नांदेड परिमंडलांतर्गत येणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील ९६० प्रलंबित शेतकऱ्यांना नवीन कृषिपंपाची वीजजोडणी देण्यात आली आहे. तर परभणी जिल्ह्यातील ९६४ प्रलंबित शेतकऱ्यांना नवीन कृषिपंपाची वीजजोडणी देण्यात आली आहे.
सर्वांत जास्त वीजजोडण्या या नांदेड जिल्ह्यात झाल्या आहेत. तब्बल २ हजार ११४ शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी देत शाश्वत सिंचनाचे स्वप्न पूर्ण केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.