Soybean Damage : सोयाबीनच्या आगारात मोठा फटका

गेले दोन हंगाम पावसाने धुळधाण केली. यंदा सोयाबीनचा हंगाम सुरू झालेला असतानाच पुन्हा पाऊस धुमाकूळ घालत आहे. सोयाबीनचे आगार म्हटले जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यात पावसाचा मोठा फटका यंदाही शेतकऱ्यांना बसत आहे.
Soybean Damage
Soybean DamageAgrowon

वाशीम ः गेले दोन हंगाम पावसाने धुळधाण केली. यंदा सोयाबीनचा हंगाम (Soybean Season) सुरू झालेला असतानाच पुन्हा पाऊस धुमाकूळ घालत आहे. सोयाबीनचे आगार म्हटले जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यात पावसाचा मोठा (Heavy Rainfall) फटका यंदाही शेतकऱ्यांना बसत आहे. उत्पादकता, मालाचा दर्जा खालावत असल्याने प्रचंड नुकसान झेलावे लागणार आहे.

Soybean Damage
Soybean Crop Damage : सोयाबीन उत्पादक शेतकरी मात्र हतबलतेच्या विळाख्यात | ॲग्रोवन

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांत बहुतांश ठिकाणी पाऊस झालेला आहे. जेथे पाऊस नव्हता अशा भागातील शेतकरी तातडीने सोयाबीन काढणीसाठी सरसावले होते. मालेगाव तालुक्यात मारसूळ शिवारात मंगळवारी (ता.११) अचानक आलेल्या पावसाने सोंगणीसाठी आलेल्या मजुरांची पळापळ झाली. शिवाय सोंगणी केलेले सोयाबीन जागेवरच भिजले.

Soybean Damage
Soybean Production: सांगलीत सोयाबीन उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटण्याची शक्यता

मारसूळ येथील सुनील भेंडेकर यांच्या कुटुंबाने यंदा ४५ एकरांत सोयाबीनची पेरणी केली आहे. सोयाबीन काढण्यासाठी स्थानिक मजुरांची वाणवा असल्याने त्यांनी मध्य प्रदेशातून मजूर आणून मंगळवारी सोंगणी सुरू केली होती. ३० मजुरांच्या साह्याने जवळपास दहा एकरांतले सोयाबीन सोंगून झाले.

अशातच दुपारी बाराच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी झाली. पावसाच्या भीतीने सोयाबीन उचलणे सुरू केले. परंतु क्षणार्धात आलेल्या जोरदार पावसाने सोंगणी केलेले सोयाबीन भिजले. उचलण्याची संधीही मिळाली नाही.

असा अनुभव भेंडेकर यांच्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांना आला. काहींचे सोंगलेले सोयाबीन शेतातच भिजल्याने त्यातून अंकूर फुटले. यंदाच्या हंगामात आधीच उत्पादनात घट दिसून आलेली आहे. त्यात पुन्हा पावसाने नुकसान खूप जास्त नुकसान होत आहे.

- सुनील भेंडेकर, शेतकरी, मारसूळ ता. मालेगाव जि. वाशीम

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com