Citrus Estate : पैठणमध्ये सिट्रस इस्टेट उभारणार ः मंत्री भुमरे

मोसंबी हब असलेल्या मराठवाड्यात पैठण तालुक्यात सिट्रस इस्टेट उभारून मोसंबीचे महत्त्व अधोरेखित करण्याचा आपला प्रयत्न आहे.
Sandipan Bhumre
Sandipan BhumreAgrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : ‘‘राज्यात सिट्रस सेंटर असूनही मोसंबी दुर्लक्षित होती. मोसंबी हब असलेल्या मराठवाड्यात पैठण तालुक्यात सिट्रस इस्टेट उभारून मोसंबीचे महत्त्व अधोरेखित करण्याचा आपला प्रयत्न आहे,’’ असे मत रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी शुक्रवारी (ता.१९) व्यक्त केले.

पैठण तालुक्यातील इसारवाडी शिवारात सिट्रस इस्टेटच्या बांधकामाचे भूमिपूजन श्री. भुमरे यांच्या हस्ते झाले.

या वेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, लीड बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, कृषी उद्योग विकास मंडळाचे विभागीय व्यवस्थापक दीपक चव्हाण, जिल्हा पणन अधिकारी संध्या पांडव, ‘महाऑरेंज’चे प्रतिनिधी संचालक रवींद्र बोरटकर, ‘सिट्रस इस्टेट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ कार्ले, संचालक नंदलाल काळे, डॉ. भगवानराव कापसे आदी उपस्थित होते.

Sandipan Bhumre
Citrus Estate : मासोद येथे सिट्रस इस्टेटला मान्यता

भुमरे म्हणाले, ‘‘सिट्रस इस्टेट सोबतच आणखी १२ कोटींचे सेंटर ऑफ एक्सलन्स (मोसंबी) मिळेल. त्यामुळे इस्राईलच्या धर्तीवर शेतकऱ्यांना संशोधनात्मक मार्गदर्शन मिळेल. सिट्रस इस्टेटचे काम लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न राहील.

Sandipan Bhumre
Citrus Crop Irrigation Management : मोसंबी बागेची पाण्याची गरज कशी भागवावी?

बियाणेच नाही तर फळ पिकांची रोपे इतर राज्यात मातृ वृक्ष नसताना कशी तयार होतात, यावरही यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे.

द्राक्ष पिकाच्या आच्छादनासाठी ५० टक्के अनुदानाचा निर्णय आपण घेतला आहे. फळपीक असो की रोजगार हमी योजना शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या अटी शिथिल करून लाभ देण्याचा प्रयत्न आहे.’’

कृषी आयुक्त चव्हाण म्हणाले, ‘‘सिट्रस इस्टेट केवळ इमारतीपुरते मर्यादित न राहता त्याचा मोसंबी उत्पादकांनी आपल्या विकासासाठी उपयोग करून घ्यावा. इसारवाडी परिसराला कृषी पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’

‘रोजगार सेवकांना देणार टॅब’

‘‘ग्रामीण भागात काम करणाऱ्या रोजगार सेवकांना बसण्यासाठी खुर्ची, टेबल दिला. आता त्यांना टॅब देण्यात येतील. जवळपास ७० कोटींचे टॅब खरेदी केले आहेत. पुढील आठवड्याभरात ते रोजगार सेवकांना दिले जातील.

कांदा चाळीला १ लाख ६० हजारांचे अनुदान देण्याचा आदेश काढला आहे. एक एकर द्राक्षाला आच्छादनासाठी ४ लाख २० हजार रुपये लागतात. त्यामध्ये ५० टक्के अनुदान देण्यात येईल.

रोजगार हमी योजना व फलोत्पादनाच्या खर्चाची बजेट वाढविण्याचा प्रयत्न आहे. ‘रोहयो’तून आधी तीन वर्षे रोजगार मिळायचा. तो आता पाच वर्ष मिळेल.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com