Crop Insurance News : तिप्पट विमा हप्त्याबाबत लवकरच निर्णय घेणार

Pik Vima : डहाणू : तालुक्यातील चिकू आणि आंबा फळांसाठी तिपटीने वाढवण्यात आलेल्या विमा हप्त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेत प्रस्ताव सादर करून निर्णय घेण्यात येईल.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

Crop Insurance Update : डहाणू : तालुक्यातील चिकू आणि आंबा फळांसाठी तिपटीने वाढवण्यात आलेल्या विमा हप्त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेत प्रस्ताव सादर करून निर्णय घेण्यात येईल. तसेच जूनपर्यंत राज्यातील दहा हजार गावांमध्ये नवीन पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात येतील, अशी ग्वाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

चिंचणी येथील गावदेवी मंदिर सभागृहात खासदार राजेंद्र गावित यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी बुधवारी (ता. १७) शेतकरी सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार राजेंद्र गावित यांनी अधिकाऱ्यांसमवेत शेतकऱ्यांच्या कृषीविषयक विविध प्रश्नांना सामोरे जात सोडवणूक करण्यात आली.

Abdul Sattar
Crop Insurance Update : विमा परताव्यासाठी अपात्र तक्रारींची फेरतपासणी

या कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुकाप्रमुख कुंदन संखे, उपनेत्या ज्योती मेहेर, रेल्वे सल्लागार मंडळाचे सदस्य केदार काळे, नरेश राऊत, राजेंद्र चुरी, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, बबन चुरी उपस्थित होते.

चिकूसाठी प्रतिहेक्टर सहा हजार रुपयांवरून १८ हजार रुपये, तर आंबा फळासाठी प्रतिहेक्टर सहा हजार रुपयांवरून वीस हजार तीनशे रुपयांपर्यंत तिपटीने विमा हप्ता वाढलेला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. किसान रेल्वे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. किसान रेल्वे पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री यांच्याशी चर्चा करून ती सुरू करण्यात येईल.

Abdul Sattar
Crop Insurance : विमा कंपनीविरोधात ‘स्वाभिमानी’चे मुंडण आंदोलन

तीन ठिकाणी कृषी शीतगृह उभारणार

जिल्ह्यातील मच्छीमारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे मान्यता देण्याचे सांगून, डहाणूच्या चिकूसाठी, केळवा माहीमची पानवेली दिल्ली आणि हिमाचल प्रदेशकडे पाठविण्याकरिता रेल्वेने डबे उपलब्ध करण्याची मागणी केली. कृषी मालाच्या साठवणुकीसाठी केळवा, बोर्ड आणि डहाणू येथे कृषी शीतगृह उभारण्याचे खासदार गावित यांनी सूचित केले.

पहिलीपासूनच कृषी अभ्यासक्रम

कृषी विभागामार्फत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते; मात्र वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान बीपेरणीपर्यंत देण्याचा प्रयत्न केला जाईल.

शिवाय बचत गटामार्फत उत्पादित होणारा भाजीपाला, शाळांना देण्याचा प्रयत्न करावा, असेही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या वर्गापासूनच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com