Marathwada Agriculture : केनियातील ल्युकेनिया विद्यापीठाचे शिष्टमंडळ मराठवाड्यात दाखल

केनियातील ल्युकेनिया विद्यापीठाचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. 5) मराठवाड्यात दाखल झाले. मराठवाड्यातील रेशीम उद्योगासह फळ पिकातील आंबा व कापूस, सोयाबीन, मका आदी पिकांच्या शेती पद्धतीची माहिती हे शिष्टमंडळ घेत आहे.
Marathwada Agriculture
Marathwada AgricultureAgrowon

औरंगाबाद : केनियातील ल्युकेनिया विद्यापीठाचे (Lukenya University) शिष्टमंडळ सोमवारी (ता. 5) मराठवाड्यात दाखल झाले. मराठवाड्यातील रेशीम उद्योगासह (Silk Farming) फळ पिकातील आंबा (Mango) व कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean), मका (Maize) आदी पिकांच्या शेती पद्धतीची माहिती हे शिष्टमंडळ घेत आहे.

मराठवाड्यातील फळबाग तज्ञ डॉ. भगवानराव कापसे सप्टेंबर 2022 मध्ये शेती पद्धतीची माहिती जाणून घेण्यासाठी केनिया दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी डॉ. कापसे यांनी केनियातील विविध आंबा फळबागांना भेटी दिल्या होत्या.

Marathwada Agriculture
Soybean Rate : सोयाबीन बाजारात काय घडलं?

ल्युकेनिया विद्यापीठाच्या तज्ञांशी संवाद साधताना भारतातील खासकरून मराठवाड्यातील आंबा पीक घेण्याची पद्धती समजावून सांगणारे सादरीकरण डॉ. कापसे यांनी केले होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील खास करून मराठवाड्यातील शेती पीक पद्धतीची माहिती जाणून घेण्याची इच्छा ल्युकेनिया विद्यापीठाच्या तज्ञांनी व्यक्त केली होती. त्यानुसार ल्युकेनिया विद्यापीठाचे तज्ञ सोमवारी मराठवाड्यात दाखल झाले.

Marathwada Agriculture
Silk Farming : कसा असावा रेशीम आराखडा?

या शिष्टमंडळात मूळचे भारतीय ल्युकेनिया विद्यापीठाचे डॉ. सचिन शहा, कसंगा डोलरस मुथेयु, कसंगा डेव्हिड दंबूकी, मुवेला सामी मुटावि आदींचा समावेश आहे. आल्याबरोबर शिष्टमंडळाने चिकलठाणा परिसरातील प्रस्तावित रेशीम प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर जालना येथील महिको कंपनीच्या अंडीपुंज निर्मिती केंद्राला तसेच कचरेवाडी परिसरातील विजय पाटील यांच्या चौकी सेंटरला व बाजार समितीमधील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेतली

यावेळी मराठवाड्यात झपाट्याने विस्तारल्या व स्वीकारल्या गेलेल्या रेशीम उद्योगाची एकूणच पद्धती केनियाच्या शिष्टमंडळाने रेशीम उपसंचालक दिलीप हाके जालनाचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते व औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष विकास अधिकारी डेंगळे यांच्याशी संवाद साधून जाणून घेतली. देवमूर्ती परिसरातील दिशा सिल्कच्या एआरएम युनिटची शिष्टमंडळ पाहणी केली.

देळेगव्हाण येथील कपाशी मका व सोयाबीन शेताची पाहणी केल्यानंतर गटशेतीशीही शिष्टमंडळ संवाद करणार होते. 6 डिसेंबरला पैठण तालुक्यातील नाथ सीड्सच्या आंबाबागेची पाहणी केल्यानंतर सिल्लोड तालुक्यातील वडाळा येथील आकाश शेळके यांच्या मका, कापूस पिकाची, मुकपाठ येथील अशोक सूर्यवंशी यांच्या अतिघन आंबा बागेची तसेच आडगाव भोंबे ता. भोकरदन येथील सोयाबीन, मका व रेशीम शेती उद्योगाची माहिती शिष्टमंडळ जाणून घेणार आहे. फळबाग तज्ञ डॉ. भगवानराव कापसे या शिष्टमंडळा सोबत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com