Silk Industry : केनियातील विद्यापीठाचे शिष्टमंडळ येणार मराठवाड्यात

केनिया या देशातील ल्युकेनिया विद्यापीठाचे शिष्टमंडळ येत्या ५ व ६ डिसेंबर रोजी मराठवाड्यात येणार आहे.
Silk Industry
Silk IndustryAgrowon

औरंगाबाद : केनिया या देशातील ल्युकेनिया विद्यापीठाचे (University of Lucania) शिष्टमंडळ येत्या ५ व ६ डिसेंबर रोजी मराठवाड्यात येणार आहे. मराठवाड्यातील रेशीम उद्योगासह (Silk Industry) फळ पिकातील आंबा, कापूस, सोयाबीन, मका आदी पिकांच्या शेती पद्धतीची माहिती हे शिष्टमंडळ जाणून घेणार आहे.

Silk Industry
Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांना अनुदानासाठी दावरवाडी फाट्यावर ‘रास्ता रोको’

मराठवाड्यातील फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे सप्टेंबर २०२२ मध्ये शेती पद्धतीची माहिती जाणून घेण्यासाठी केनिया दौऱ्यावर गेले होते. या वेळी त्यांचा ल्युकेनिया विद्यापीठाच्या भारतीय सहकाऱ्यांशी संवाद झाला होता. त्या वेळी डॉ. कापसे यांनी केनियातील विविध आंबा फळबागांना भेटी दिल्या होत्या.

ल्युकेनिया विद्यापीठाच्या तज्ज्ञांशी संवाद साधताना भारतातील खासकरून मराठवाड्यातील आंबा पीक घेण्याची पद्धती समजावून सांगणारे सादरीकरण डॉ. कापसे यांनी केले होते. त्याच वेळी महाराष्ट्रातील खास करून मराठवाड्यातील शेती पीक पद्धतीची माहिती जाणून घेण्याची इच्छा ल्युकेनिया विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.

शिवाय डॉ. कापसे यांनी त्यांच्या जनजागृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना मराठवाड्यातील पीक पद्धती समजून घेण्यासंबंधी निमंत्रणही दिले होते. त्यानुसार ल्युकेनिया विद्यापीठाचे तज्ज्ञ येत्या ५ व ६ डिसेंबरला मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. त्यामध्ये भारतीय वंशाचे ल्युकेनिया विद्यापीठाचे प्रो चान्सलर डॉ. हेडा यांच्यासह डॉ. सचिन शहा, कसंगा डोलरस मुथेयु, कसंगा डेव्हिड दंबूकी, मुवेला सामी मुटावि आदींचा समावेश असल्याचे डॉ. कापसे म्हणाले. ५ डिसेंबरला सकाळी ९ वाजेपासून शिष्टमंडळाचा औरंगाबाद जिल्ह्यात दौरा होणार आहे. त्यानुसार चिकलठाणा परिसरातील प्रस्तावित रेशीम प्रकल्पाला शिष्टमंडळ भेट देईल. त्यानंतर जालना येथील महिको कंपनीच्या अंडीपुंज निर्मिती केंद्राला तसेच शीतगृहाला शिष्टमंडळ भेट देईल.

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील रेशीम बाजारपेठेची व्यवस्था व येणाऱ्या कोषांची पाहणी केल्यानंतर कचरेवाडी येथे शिष्टमंडळ भेट देईल. तसेच देवमूर्ती परिसरातील दिशा सिल्कच्या एआरएम युनिटची शिष्टमंडळ पाहणी करेल. देळेगव्हाण येथील कपाशी मका व सोयाबीन शेताची पाहणी केल्यानंतर गटशेतीशीही शिष्टमंडळ संवाद करणार आहे.

Silk Industry
Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांना अनुदानासाठी दावरवाडी फाट्यावर ‘रास्ता रोको’

६ डिसेंबरला पैठण तालुक्यातील नाथ सीड्सच्या आंबाबागेची पाहणी केल्यानंतर सिल्लोड तालुक्यातील वडाळा येथील आकाश शेळके यांच्या मका, कापूस पिकाची, मुकपाठ येथील अशोक सूर्यवंशी यांच्या अतिघन आंबा बागेची तसेच आडगाव भोंबे (ता. भोकरदन) येथील सोयाबीन, मका व रेशीम शेती उद्योगाची माहिती शिष्टमंडळ जाणून घेणार असल्याचे डॉ. कापसे म्हणाले. रेशीमचे उपसंचालक दिलीप हाके यांच्याशीही ल्युकेनिया विद्यापीठाच्या तज्ज्ञांचा संवाद घडवून आणल्याचे डॉ. कापसे यांनी सांगितले.

केनियातील अतिमागास भागातील शेतकऱ्यांना मराठवाड्यातील शेती पीक पद्धतीतून शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत देण्याच्या दृष्टीने तसेच तेथील शेती पद्धती मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अवगत होण्याच्या दृष्टीने ल्युकेनिया विद्यापीठाच्या शिष्टमंडळाचा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे.

- डॉ. भगवानराव कापसे, फळबाग तज्ज्ञ, औरंगाबाद

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com