Crop Damage: चार एकरांवरील सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरवले रोटावेटर

जुलै महिन्यात पाऊस झाला. त्यामुळे या महिन्यात चार एकरांवर सोयाबीन पिकाची (Soybean Crop) पेरणी केली. परंतु या महिन्यात सुरू झालेला संततधार पाऊस ऑगस्ट महिन्यापर्यंत थांबलाच नाही.
Crop Damage
Crop DamageAgrowon

उजनी, जि. लातूरः वेळोवेळी फवारण्या करूनही पिकांमध्ये सुधारणा होत नसल्याने व अपेक्षित उत्पादनाच्या तुलनेत होत असलेला जास्तीचा उत्पादन खर्च (Production Cost) पाहून उजनी (ता. औसा) येथील संतोष ढासले या शेतकऱ्याने चार एकरांवरील सोयाबीनवर (Soybean) रविवारी (ता. २८) रोटावेटर फिरवले.

जुलै महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची (Soybean Crop) समाधानकारक वाढ झाली नाही. पिके पिवळी पडली. त्यात गोगलगायीने पिकावर केलेला हल्ला त्यासोबतच खोडअळी, हळद्या आदींसारख्या संकटामुळे सोयाबीन पिकाचे या वेळी मोठे नुकसान झाले आहे. सुरुवातीला जून महिन्यात पावसाचा खंड पडला.

जुलै महिन्यात पाऊस झाला. त्यामुळे या महिन्यात चार एकरांवर सोयाबीन पिकाची (Soybean Crop) पेरणी केली. परंतु या महिन्यात सुरू झालेला संततधार पाऊस ऑगस्ट महिन्यापर्यंत थांबलाच नाही. परिणामी, पावसाने उघडीप न दिल्यामुळे नुकतीच उगवण झालेल्या कोवळ्या पिकांना हा पाऊस सोसला नाही आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले.

सततच्या ओलीमुळे पिकांची वाढ झाली नाही. पिके पिवळी पडली. त्यानंतर आश्‍चर्यकारकपणे गोगलगायीने पिकावर हल्ला केला आणि बहुतांश पीक त्यांनी फस्त केले. एवढेच नाही तर उर्वरित पिकावर खोडअळी, हळद्या यांसारख्या रोगांची लागण झाली. या पार्श्‍वभूमीवर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याने पीक नष्ट करण्याची वेळ आल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकरी हताश, शासनाकडून मदतीची अपेक्षा

विविध नैसर्गिक संकटामुळे (Natural Calamity) शेतकरी हताश झाले आहेत. यामुळे वैतागून शेवटी पिके नष्ट करण्याची त्यांच्यावर आली आहे. मागील काही दिवसांपासून परिसरात पिके नष्ट करण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या वेळी शासनाने राजकारण बाजूला ठेवून तत्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून आधार देण्याची गरज आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com