Farmers Hostel : शेगाव भक्तनिवासाच्या धर्तीवर शेतकरी निवास

बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकदा मुक्कामाची समस्या असते. सोयाबीनचा हंगाम सुरू असल्याने बाजारात जवळपास दोनशे शेतकऱ्यांचे दररोज आगमन आहे.
Farmers Hostel Baramati KVK
Farmers Hostel Baramati KVKAgrowon

Shetkari Niwas News अमरावती : श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथील भक्तनिवासाच्या धर्तीवर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Amaravati APMC) शेतकरी निवास (Farmers Hostel) सुरू करण्यात येत आहे. परगावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांची त्यामुळे नाममात्र दरात निवासाची सोय होणार आहे. भोजनाची व्यवस्था यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे.

बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकदा मुक्कामाची समस्या असते. सोयाबीनचा हंगाम सुरू असल्याने बाजारात जवळपास दोनशे शेतकऱ्यांचे दररोज आगमन आहे.

बऱ्याचदा लिलाव न झाल्यास किंवा मोजमाप करण्यास विलंब झाल्यास परगावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांना मुक्काम करावा लागतो.

Farmers Hostel Baramati KVK
Indian Agriculture : आर्थिक अराजकतेचे दुष्टचक्र कधी संपणार?

अशा वेळी त्यांना अडत्यांच्या दुकानात मुक्काम करावा लागतो किंवा खासगी लॉज वा हॉटेलमध्ये पैसे मोजून मुक्काम करावा लागतो. काही शेतकरी यार्डात उघड्यावर किंवा वाहनातच मुक्काम करतात.

अशा वेळी त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या बाजार समितीत प्रशासकराज आहे. प्रशासकाची जबाबदारी असलेले जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी ही बाब हेरून त्याची गांभीर्याने दखल घेत शेतकरी निवास सुरू करण्याची योजना आखली आहे.

Farmers Hostel Baramati KVK
Indian Agriculture : या शेती क्षेत्राचे नक्की काय करायचे?

बाजार समितीमधील टीएमसी यार्ड येथे हे शेतकरी निवास सुरू करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत असलेल्या शेतकरी निवासात प्रारंभी १५ शेतकऱ्यांच्या निवासाची सोय करण्यात येणार आहे. प्रतिसाद बघून नंतर ही संख्या वाढविण्यात येणार आहे.

Farmers Hostel Baramati KVK
Indian Agriculture : कृषी क्षेत्र म्हणजे देशाचा कणा ः राज्यपाल कोश्‍यारी

शेतकरी निवासात मुक्काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पलंग, गादी, उशी यासह प्रसाधनासह आंघोळीची सोय राहणार आहे. शेतकऱ्यांना साबण, तेल व दंतमंजन बाजार समितीकडून पुरविण्यात येईल. भोजनासाठी बाजार समितीत पाच रुपयांत व दहा रुपयांत शिवभोजन उपलब्ध आहे.

मुक्काम करणाऱ्या शेतकऱ्यांना ही सुविधा नाममात्र एक रुपयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सातबाराची प्रत व अडत्याचे पत्र आणावे लागणार आहे. प्रशासक डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभे राहणारे शेतकरी निवास सुरू होणार आहे, अशी माहिती बाजार समिती व्यवस्थापनाने दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com