Water Supply Scheme : कासारीच्या पाणीपुरवठ्यासाठी सव्वा तीन कोटींचा निधी मंजूर

कासारी (ता. शिरूर) येथील पाणीपुरवठा योजनेसाठी ‘जलजीवन मिशन’ योजनेचा ३ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच सुनीता सुखदेव भुजबळ यांनी दिली.
Water Supply
Water Supply Agrowon

तळेगाव ढमढेरे, जि. पुणे ः कासारी (ता. शिरूर) येथील पाणीपुरवठा योजनेसाठी (Water Supply Scheme) ‘जलजीवन मिशन’ योजनेचा (Jal Jeevan Mission) ३ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच सुनीता सुखदेव भुजबळ यांनी दिली.

Water Supply
Water Project : जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प रुतले गाळात

कासारी गावची लोकसंख्या सुमारे ४ हजारांच्या आसपास असून, गावासाठी जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा विभागाकडून निधी उपलब्ध झाला आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Water Supply
Water Supply Scheme : पाण्याच्या गुणवत्तेसाठी ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान

या योजनेतून गावातील सर्व वाडी-वस्त्यांवर घरोघरी नळजोडणी करून त्याद्वारे पाणी मिळणार असल्याने महिलांकडून समाधान व्यक्त होत आहे. गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दर वर्षी उद्भवत असतो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला असल्याचे सरपंच सुनीता भुजबळ यांनी सांगितले.

‘‘पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी ग्रामसेवक वसंत पवार, माजी उपसरपंच सुखदेव भुजबळ, रोहिणी रासकर, संभाजी भुजबळ, किरण रासकर, गोपाळ भुजबळ, गणपतराव काळकुटे, स्नेहल भुजबळ, स्वाती नवले, सुनीता दगडे, पूनम नवले या सर्व ग्रामपंचायत सहकाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी केलेल्या मदतीमुळे गावात पाणीपुरवठ्यासह विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला,’’ असेही सरपंच भुजबळ यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com