Amaravati News : पंचायत समिती परिसरात बहरली आरोग्यदायी परसबाग

तिवसा पंचायत समितीने महिला समूहांना रोजगार मिळावा, याकरिता सेंद्रिय भाजीपाला उत्पादनाच्या उद्देशाने पंचायत समितीच्या परिसरातच परसबाग फुलविली आहे.
Amaravati Panchayat Samiti
Amaravati Panchayat SamitiAgrowon

Amaravati Panchayat Samiti News अमरावती ः तिवसा पंचायत समितीने (Tivasa Panchayat Samiti) महिला समूहांना रोजगार (Women Employment) मिळावा, याकरिता सेंद्रिय भाजीपाला उत्पादनाच्या (Organic Vegetable Production) उद्देशाने पंचायत समितीच्या परिसरातच परसबाग फुलविली आहे. या अभिनव परसबागेत उत्पादित भाजीपाल्याची विक्री पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनाच केली जात आहे.

सभापती कल्पना दिवे तसेच गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘उमेद अभियाना’तून कृती संगम कार्यक्रमा अंतर्गत परसबागेची संकल्पना साकारली आहे. तालुक्‍यात ७६४ वैयक्‍तिक, तर २० सामूहिक परसबाग साकारल्या आहेत.

सालोरा, धोत्रा, कुऱ्हा या गावांमध्ये देखील त्या आहेत. कृषी विभागामार्फत याकरिता प्रथमच निःशुल्क बियाणे देण्यात आले. सध्या मुळा, पालक, मेथी, कोबी अशा भाजीपाल्याचे १४ वाफ्यांत उत्पादन होते. १५ बाय १५ फूट असा आकार परसबागेसाठी निश्‍चित केला आहे.

Amaravati Panchayat Samiti
Agriculture Pump Theft : कापूस, वीजपंप चोरीच्या घटना वाढल्या

त्यासोबतच आवळा, पेरू, चिंच, जांभूळ अशा फळझाडांची लागवड देखील केली आहे. तिवसा पंचायत समितीमध्ये ६० कर्मचारी असून, त्यापैकी २२ कर्मचारी दर आठवड्याला परसबागेतील भाजीपाला खरेदी करतात. बागेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एका रोजगार सेवकाकडे सोपविण्यात आली आहे.

Amaravati Panchayat Samiti
Agricultural Pump : शेतीपंप विजेचा प्रश्‍न कायम अधांतरी

तिवसा तालुक्‍यात चार कृती संगम सखी असून, एका सखीकडे पाच गावांची जबाबदारी आहे. परसबाग तयार करणे, पोषण आहाराविषयी जागृती, गरोदर माता, किशोरवयीन मुली यांना आरोग्याविषयक सल्ला देण्यावर सखींचा भर राहतो.

- श्रुती वानखडे, तालुका व्यवस्थापक, कृती संगम, तिवसा पंचायत समिती

ग्रामीण भागात घरासमोर मोकळी जागा राहते. अशा जागेत परसबागेच्या या संकल्पनेतून भाजीपाला उत्पादन घेतल्यास त्यातून घरच्या भाजीपाल्याची सोय होण्यासोबतच शिल्लक भाजीपाला विक्री करता येईल. यातून कुटुंबाला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल.

- कल्पना दिवे, सभापती, पंचायत समिती, तिवसा

शाळा, अंगणवाड्यांना खास बियाणे किट तयार करून त्याचे वितरण केले. शाळा, अंगणवाडी तेथे पोषणबाग ही संकल्पना राबविण्यात आली. याची काही शाळा, अंगणवाड्यांनी अंमलबजावणी केली. पपई, शेवगा, कढीपत्ता व शक्‍य असेल त्या ठिकाणी लिंबूचे झाड लावण्याची सूचना करण्यात आली.

- डॉ. चेतन जाधव, गटविकास अधिकारी, तिवसा, अमरावती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com