Rain Update : शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

भातशेती व अन्य पिकांच्या लागवडीवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानभरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
Paddy Cultivation
Paddy CultivationAgrowon

वसई : गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात (Palghar District) पावसाने दमदार हजेरी (Heavy Rainfall) लावली आहे. यामुळे भातशेती (Paddy Agriculture) व अन्य पिकांच्या लागवडीवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानभरपाई (Crop Damage) शासनाकडून मिळावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

Paddy Cultivation
Crop Damage : मूग, उडदाची पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली

एकीकडे भात पिकाच्या कापणीचा हंगाम सुरू असताना पावसाने अचानक हजेरी लावली. डहाणू, पालघर, बोर्डी, वसई-विरार भागासह अन्य ठिकाणी पावसाची सुरुवात झाली. हवामान खात्याने पुढील ४ दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतातील भात कापणी हंगामातच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Paddy Cultivation
Crop Damage Survey : सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी

या पावसामुळे जर भात पूर्णपणे कुजला तर मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे; तर पावसामुळे वसई, विरार शहरातील आचोळे, ओसवाल नगरी, तुळींजसह अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे वाहतूक कोंडी, नागरिकांचे हाल झाले, तर वसई-विरार पश्चिम व पूर्व भागात असणाऱ्या शेतीला देखील प्रचंड फटका बसला असल्याने पिकावर रोगाचा प्रादुर्भाव येण्याची चिंता निर्माण झाली आहे.

Paddy Cultivation
Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांच्या मदत निधी वाटपात हयगय करणाऱ्यांवर कारवाई

हाता-तोंडाशी आलेला घास हिरावणार

बोर्डी : बोर्डी परिसरात भात शेतीत पावसाचे पाणी शिरल्याने शेतकरी कात्रीत सापडला आहे. त्यामुळे बळीराजाच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतो काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. डहाणू तालुक्यात रब्बीसाठी हजारो हेक्टर जमिनीवर शेडनेट उभारून मिरची, वांगी, काकडी, टोमॅटो इत्यादी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

चालू वर्षी सततच्या पावसाने रोप तयार करण्याच्या प्रक्रियेला सातत्याने अडथळा निर्माण झाल्यामुळे रब्बी हंगाम लागवड उशिरा होण्याची शक्यता असल्याने डिसेंबर महिन्यात येणारे उत्पादन कमी प्रमाणात होणार असल्याचा असा अंदाज कृषीभूषण शेतकरी रामचंद्र सावे यांनी व्यक्त केला आहे. भातपीक कुजण्याची भीती

कासा : जिल्ह्यामध्ये गेल्या दोन

दिवस सातत्याने पाऊस येत असल्याने आदिवासीबहुल भागात शेतीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. एकीकडे शेतीशिवाय अन्य उत्पन्नाचे साधन नसताना खायचे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.

परतीच्या पावसामुळे प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. डहाणू, कासा, तलासरी सह आजूबाजूच्या परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दर्शविलेला अंदाज खरा ठरला तर पुढील काही दिवसांत तयार झालेले भातपीक कुजण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहे.

यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे दिलासा मिळाला असताना परतीच्या पावसाने झोडपले. कापणी करून देखील परिश्रम व पैसे वाया जाणार आहेत.

- महेंद्र बसवत, धरमपूर शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com