
सोलापूर ः आहेरवाडी-फताटेवाडी येथील राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाला (Power Generation) (एनटीपीसी) मोठ्या प्रमाणात बायोमास पॅलेटसची (Biomass Pallets) आवश्यकता आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC), शेतकरी गट यांना ते पुरवठ्याची आणि त्या माध्यमातून रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होणार आहे. त्या चर्चेसाठी मंगळवारी (ता. २७) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि आत्माने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. आहेरवाडी येथील राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामध्ये सकाळी अकरा वाजता शेतकरी कंपन्या, शेतकरी गट अध्यक्ष, सदस्यांची बैठक होणार आहे.
औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला शेतीमधील टाकाऊ पदार्थांपासून तयार केलेल्या बायोमास पॅलेटची अंदाजे प्रतिदिवस ३८० टन एवढी आवश्यकता आहे. शेतीमधून निर्माण झालेला काडीकचरा, तुराट्या, पराठ्या, कडधान्य धान्याच्या टाकाऊ पदार्थ इत्यादीपासून तयार केलेले पेलेट औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला आवश्यक आहे.
त्याचा पुरवठा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गट करू शकतील, असा या बैठकीच्या चर्चेमागील हेतू आहे. त्या माध्यमातून मोठी व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी शेतकरी कंपन्या, शेतकरी गट यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.