शिंदे आणि समर्थकांना परत बोलवा: उच्च न्यायालयात याचिका दाखल

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या समर्थक हे लोकसेवक आहेत. त्यांच्या गैरहजेरीमुळे राज्यात गोधळ सुरु आहे. संबंधित नेते आपले विहित कर्तव्य सोडून स्वतःच्या हितसंबंधांना आणि महत्वकांक्षांना प्राधान्य देत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे सर्वसामान्य नागरिकांची, मतदारांची गैरसोय होत असल्याचेही याचिकाकर्त्याने नमूद केले.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहितयाचिका (PIL) दाखल करण्यात आली. या आमदारांनी राज्यात परतून आपले कर्तव्य पार पाडावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाकडे ही याचिका दाखल करण्यात आली. उत्पल चंदावार यांनी वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून ही जनहितयाचिका दाखल केली.

राज्यात सुरु असलेल्या राजकीय गोंधळामुळे सर्वसामान्य जनतेचे नागरी हक्क डावलले जात आहेत. सर्वसामान्य जनतेचे हाल सुरु आहेत. ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले ते आणि मंत्री सर्वसामान्य जनतेप्रती त्यांची कर्तव्ये बजावण्याऐवजी स्वतःच्या हितांना प्राधान्य देत आहेत. स्वतःची विहित कर्तव्य पार पाडत नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले.

Eknath Shinde
कृषिमंत्र्यांच्या गैरहजेरीत शेतकऱ्यांची काळजी घ्या: मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी ही याचिका दाखल करून घेतल्याचे सांगताना यावर सुनावणी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक अनधिकृतरीत्या सुट्टीवर गेले आहेत. त्यांना तात्काळ राज्यात परतण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली.

शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ महत्वाचा आहे. खरीप हंगामातील पेरण्यांचे काम सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रास्त दरात व निर्धारित वेळेत खते, बी-बियाणे उपलब्ध होते की नाही, हे पाहणे गरजेचे आहे. अशावेळी राज्याच्या कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे होते. प्रत्यक्षात कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) गुहावटी येथे वास्तव्यास गेल्याचे याचिकेत म्हटले आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबतच्या समर्थक हे लोकसेवक आहेत. त्यांच्या गैरहजेरीमुळे राज्यात गोधळ सुरु आहे. संबंधित नेते आपले विहित कर्तव्य सोडून स्वतःच्या हितसंबंधांना आणि महत्वकांक्षांना प्राधान्य देत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे सर्वसामान्य नागरिकांची, मतदारांची गैरसोय होत असल्याचेही याचिकाकर्त्याने नमूद केले.

दरम्यान शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अपात्रतेच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सोमवारी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

स्वतःविरुद्ध अविश्वासाचा ठराव आलेला असताना विधानसभेचे उपाध्यक्ष राज्यघटनेतील १० व्या श्येडुलनुसार आमदारांवर अपात्रतेची कारवाई करू शकत नाहीत. नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडामोडीत ते सक्रिय आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वैचारिक मतभेद लक्षात घेता ते निरपेक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत अशा काही प्रमुख मुद्यांच्या आधारे शिंदे यांनी न्यायालयात दाद मागितली. ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे (Hrish Salve) यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू मांडणार आहेत. शिवसेनेतर्फे अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhavi) युक्तिवाद करणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com