Soil Test : माणगावात ‘माती परीक्षण प्रयोगशाळा’ उभारणार

जागतिक मृदा दिनानिमित्त माणगाव तालुक्यातील तळेगाव येथे तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विपुल उभारे यांनी लवकरच ‘माती परीक्षण प्रयोगशाळा’ माणगावमध्ये उभारणार असल्याची घोषणा केली.
Soil Test
Soil TestAgrowon

माणगाव : जागतिक मृदा दिनानिमित्त (World Soil Day) माणगाव तालुक्यातील तळेगाव येथे तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विपुल उभारे यांनी लवकरच ‘माती परीक्षण प्रयोगशाळा’ (Soil Test Lab) माणगावमध्ये उभारणार असल्याची घोषणा केली. दरवर्षी ५ डिसेंबरला जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने या वर्षी माती परीक्षणेतून मृदाचे आरोग्य समजणार आहे.

Soil Test
Soil Nutrient : जमिनीतील अन्नद्रव्यांचा उपसा, पुरवठा यामधील तफावत कमी करावी

दरवर्षी मृदा दिवस साजरा करताना एक वेगळी थीम तयार केली जाते. वर्षभर त्याआधारे मृदा संवर्धनासाठी जागरूकता केली जाते. या वर्षी ‘मृदेला जिवंत ठेवा, मृदेच्या जैवविविधतेचे संरक्षण करा’, अशी मृदा दिवसाची थीम आहे. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Soil Test
World Soil Day : जागतिक मृदादिनी बोर्डी येथे तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अलिकडच्या काळात शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाठ रासायनिक खते, शहरीकरण आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे. केवळ एक इंच सुपीक मृदेचा थर तयार होण्यासाठी ८०० ते हजार वर्षांचा कालावधी लागतो.

Soil Test
Soil Management : जमिनीचे शाश्वत व्यवस्थापन

माणगाव येथे माती परीक्षण प्रयोगशाळा निर्माण झाल्यावर त्यातून मृदा (माती) आरोग्य पत्रिकेद्वारे जमिनीतील उपलब्ध अन्न द्रव्यांचे प्रमाण समजणार आहे. याबाबतच्या माहितीचा उपयोग तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध पिकांना योग्य प्रमाणात संतुलित खते देण्यासाठी होणार आहे.

माती परीक्षणानुसार खताचे व्यवस्थापन केल्यास जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे आणि पिकांचे उत्पादन वाढणे व खर्चाची बचत होण्यास मदत होणार आहे. या वेळी सरपंच नीलेश म्हात्रे, ग्रामसेवक निशिगंधा उकिरडे, वैभव मोरे, जितेंद्र तेटगुरे, कृषी सहायक अश्विनी जगताप, किशोर घोडविंदे उपस्थित होते.

जैवविविधता टिकवण्यात मातीचा मोलाचा वाटा

मातीला आपण ‘काळी आई’ असे संबोधतो. त्या आईची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. मातीचे स्वास्थ्य टिकवणे आणि तिच्या शाश्वत व्यवस्थापनेच्या प्रक्रियेसाठी जागरूकता निर्माण करणे, हा उद्देश जागतिक मृदा दिवस साजरा करण्यामागे आहे. आरोग्यदायक माती ही आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. मातीमध्ये पाणी साठवण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे, असे विपुल उभारे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com