Ratnagiri Flood : रत्नागिरीतील ५ नद्यांच्या पुराचा होणार अभ्यास

अतिवृष्टीमुळे नद्यांना येणाऱ्या पुरामुळे शहरे पाण्याखाली जातात. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राज्यात राबवला जात आहे.
 River
RiverAgrowon

रत्नागिरी ः अतिवृष्टीमुळे नद्यांना (River) येणाऱ्या पुरामुळे शहरे पाण्याखाली जातात. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राज्यात राबवला जात आहे. यासाठी १०३ नद्यांची निवड केली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, बावनदी, सावित्री या पाच नद्यांचा समावेश आहे.

या उपक्रमाद्वारे नद्यांचा सविस्तर अभ्यास करून समस्या व उपाययोजनांचा अहवाल वर्षभरात जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे. त्यानुसार अंमलबजावणी करून पूरमुक्त शहर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

 River
Agricultural News : अधिकाऱ्यांचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद सुरू

पावसाळी अधिवेशनामध्ये चिपळूण, महाड येथील पुराबाबत जोरदार चर्चा झाली होती. पूर येऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले होते. चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम तत्काळ सुरू केल्यामुळे फायदा झाला. याचा विचार करून सर्व नद्यांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत यात्रेचा पहिला टप्पा

३० नोव्हेंबरपर्यंत यात्रेचा पहिला टप्पा होईल. १ ते २० जानेवारी २०२३ या काळात अहवाल अंतिम होईल. प्रक्षेत्र भेट किंवा शिवारफेरीवेळी समन्वयकांनी अभ्यासपूर्ण नोंदी करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावयाच्या आहेत. यासाठी लागणारा खर्च हा जिल्हा नियोजनमधून करावयाचा आहे.

चला नदीला जाणून घेऊया’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत पर्यटन विभागाकडून शासननिर्णय जारी केला आहे. याद्वारे समस्यांचा अभ्यास करून लोकांमध्ये जनजागृती केली जाईल. प्रत्येक नदीसाठी समन्वयक नेमला आहे.

- जगदीश पाटील, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com