Gram Panchayat Computerization
Gram Panchayat ComputerizationAgrowon

Computerization : एक हजार ग्रामपंचायती अजूनही संगणकाविना

संगणकीकरणाविना राज्यातील अजूनही एक हजार ग्रामपंचायती दुर्लक्षित आहेत. राज्यातील २६ हजार ९२३ ग्रामपंचायतींमध्ये संगणक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

कोल्हापूर : संगणकीकरणाविना (Computerization) राज्यातील अजूनही एक हजार ग्रामपंचायती (Gram Panchayat) दुर्लक्षित आहेत. राज्यातील २६ हजार ९२३ ग्रामपंचायतींमध्ये संगणक सुविधा (Computer Facility) उपलब्ध करण्यात आली आहे. देशातील २ लाख ७१ हजार ७७० ग्रामपंचायती, पारंपरिक स्थानिक स्वराज संस्थांपैकी २ लाख १९ हजार ८८९ ग्रामपंचायती संगणकीकृत झाल्या आहेत. अजूनही देशातील ५१,८८१ ग्रामपंचायतींचे संगणकीकरण होणे बाकी आहे.

उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे १०४०० ग्रामपंचायती संगणकाविना आहेत. अंदमान निकोबार, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ लक्षद्वीप, मध्य प्रदेश, ओरिसा, दादरा नगर हवेली, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये ग्रामपंचायतींचे शंभर टक्के संगणकीकरण झाले आहे.

Gram Panchayat Computerization
Indian Agriculture : आर्थिक स्थैर्याकरिता शेतीपूरक उद्योगांची गरज

ताज्या आकडेवारी नुसार देशात उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींची संख्या आहे. या राज्यात ५८ हजार १८९ ग्रामपंचायती आहेत. ४७ हजार ७८८ ग्रामपंचायतींत संगणकाची सुविधा आहे. तेलंगणामध्ये फारशी समाधानाची स्थिती नाही. तेलंगणातील १२ हजार ७६९ पंचायतींपैकी केवळ ४४३६ ग्रामपंचायतींत संगणक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Gram Panchayat Computerization
Indian Agriculture : प्रत्यक्ष काम करणारे होऊयात...

...ही सहा राज्ये ५० टक्क्यांच्याही खाली

अरुणाचल प्रदेश, आसाम, हरियाना, नागालँड, मिझोराम, सिक्कीम आदी राज्यांमध्ये ५० टक्केही ग्रामपंचायती संगणकीकृत झाल्या नसल्याची स्थिती आहे. दळणवळणाचा अभाव व भौगोलिक परिस्थितीमुळे या राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये अजूनही संगणकीकरण झालेले नसल्याची स्थिती आहे.

वार्षिक कृती आराखड्यात तरतूद अपेक्षित

ग्रामपंचायतींना संगणक आणि तांत्रिक मनुष्यबळ पुरवणे ही प्रामुख्याने राज्यांची जबाबदारी आहे. यामध्ये केंद्राचा फारसा वाटा राहत नाही. राज्यांनी त्यांच्या वार्षिक कृती आराखड्यात याबाबतची तरतूद करणे अपेक्षित आहे. असे असले तरी एक एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत मंजुरी मिळालेल्या सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान योजने अंतर्गत मर्यादित स्वरूपात सर्व ग्रामपंचायतींना मदत करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल मोरेश्वर-पाटील यांनी लोकसभेत दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com