Contaminated Water : कांदळवनाच्या सुरक्षेला धोका

तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावरील आणि खाड्यांमध्ये भरतीच्या प्रवाहाबरोबर दूषित पाण्यामुळे खारफुटी करपू लागली आहे.
Contaminated Water
Contaminated WaterAgrown

उरण : तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावरील आणि खाड्यांमध्ये भरतीच्या प्रवाहाबरोबर दूषित पाण्यामुळे (Contaminated Water) खारफुटी करपू लागली आहे. या घटनेमुळे पाण्यामध्ये रसायने सोडले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खारफुटी का करपू लागली आणि रसायने कोणाकडून सोडले जात आहे, याची चौकशी करण्याची मागणी निसर्ग वाचवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.

उरण तालुक्यात जवळपास सहा हजार हेक्टर जमिनीवर खारफुटीची वाढ झाली आहे. काही भागांत पारंपरिक बंदिस्त फुटल्याने शेतीमध्ये खारफुटी वाढल्या आहे. तर काही ओसाड असणाऱ्या जागांवर खारफुटीचे प्रमाण वाढले आहे. प्रकल्पासाठी आरक्षित असणाऱ्या जागांवर कांदळवन वाढल्याने सीआर झेडला लागून असणारे प्रकल्प अडचणीत आले आहेत.

Contaminated Water
Fodder Crop : पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड | ॲग्रोवन

त्यामुळे या खारफुटीवर कचरा टाकून जाळणे, ट्रॅंकरमधून रसायने आणून खाड्यामध्ये सोडणे अशा प्रकारचे प्रकार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी पागोटेजवळील एनएमएसईझेडच्या अतिसंवेदनशील विभाग म्हणून प्रतिबंधित असलेल्या जागेत घातक रसायनांचे टँकरच्या टँकर रिते केले. परिणामी, या परिसरातील शेकडो खारफुटीची झाडे जळून गेली होती.

भेंडखळ खाडीतही अशा प्रकारेची रसायने सोडल्याने मासळी मृत पावली होती. याबाबतच्या तक्रारी तहसीलदार आणि पोलिस ठाण्यात दाखल केल्या होत्या. खारफुटी मारण्यासाठी झाडांवर रसायनांची फवारणी केल्यानंतर तेथील पाण्याचा रंग बदलल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खारफुटी मारण्यासाठी रसायनांचा वापर केला जात असल्याचा आरोप निसर्गप्रेमींकडून केला जात आहे.

Contaminated Water
Water Level : मराठवाड्यात भूजल पातळी सर्वच तालुक्यांत वाढली

उरण तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असून, रसायने प्रकल्पांतही वाढ झाली आहे. त्‍याचा विपरीत परिणाम कांदळवनांवर वाढला आहे. अशा प्रकारचे दूषित रसायनयुक्त पाणी सोडल्याने मासे मृत होण्याचे प्रमाण वाढल्याने मच्छीमारांवरही संकट ओढवले आहे.

उरण तालुक्यातील कांदळवन परिसरातील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे खारफुटी करपण्याची शक्यता आहे. परंतु, तसे नसेल तर त्याची चौकशी केली जाईल.

- भाऊसाहेब अंधारे,

तहसीलदार, उरण

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com