Agrowon Exhibition : यंत्रशक्तीच्या दालनांमध्ये लाखोंची उलाढाल

‘अॅग्रोवन’चे प्रदर्शन म्हणजे आधुनिक कृषितंत्राचा उत्कृष्ट महामेळावा ठरले आहे. रोज हजारो शेतकरी या प्रदर्शनाला भेट देत असून आधुनिक यंते, उपकरणे व तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या स्टॉल्सभोवती गर्दी करीत आहेत.
agriculture Technology
agriculture TechnologyAgrowon

औरंगाबाद ः आधुनिक शेतीची (Modern Agriculture) आस लागलेल्या परराज्यांतील शेतकऱ्यांनी ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात (Agrowon Exhibition) केवळ माहिती घेत आणि प्रात्यक्षिकांवर समाधान मानले नसून थेट मोठमोठी अवजारे खरेदी करत शिवारांकडे कूच केली.

शेतकऱ्यांनी ८० हजारांच्या मिनी डाळ मिल मशिनपासून ते ३३ लाखांच्या ‘बुल बॅकहो लोडर’पर्यंतची कृषी यंत्रे खरेदी (Agriculture Machinery) करीत कृषी क्षेत्राच्या ‘हायटेक’ वारीत प्रवेश केला.

agriculture Technology
Agrowon Exhibition : ‘महाऊर्जे’च्या दालनावर वीज बचतीचा संदेश

‘अॅग्रोवन’चे प्रदर्शन म्हणजे आधुनिक कृषितंत्राचा उत्कृष्ट महामेळावा ठरले आहे. रोज हजारो शेतकरी या प्रदर्शनाला भेट देत असून आधुनिक यंते, उपकरणे व तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या स्टॉल्सभोवती गर्दी करीत आहेत.

मराठवाड्यातील फुलंब्रीचे शेतकरी कृष्णा पाथरे यांनी ३३ लाखांचे बॅकहो लोडर खरेदी करीत आघाडी घेतली. या यंत्रामुळे सिंचनाशी संबंधित खोदाईची सर्व कामे करता येणार आहेत.

मजूरटंचाईमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना उपयुक्त यंत्रे हवी आहेत. त्यासाठी ते कितीही किंमत मोजण्यास तयार असल्याचे चित्र प्रदर्शनात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले.

एका शेतकऱ्याने स्वराज कंपनीचे २५ लाखांचे हार्वेस्टर खरेदी केले. याशिवाय सोनालिकाचा एक ट्रॅक्टरही विकला गेला. आधुनिक नांगर, रोटावेटरचीही विक्री झाली. ड्रोन संकल्पनेची भुरळ पडलेल्या ३० ते ३५ शेतकऱ्यांनी थेट ड्रोन खरेदी करण्याचा संकल्प केल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे बेरोजगार तसेच युवा शेतकरीदेखील ड्रोन व्यवसायात उतरत असल्याचे स्पष्ट झाले. विहिरीवर सेन्सर आधारित कृषिपंपाला मोबाइलद्वारे चालू-बंद करणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पसंत पडले आहे. जंगली जनावरांपासून पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्यामुळे जनावरांना सौर ऊर्जेच्या उपकरणाचा धक्का (शॉक) देणारे तंत्रदेखील या प्रदर्शनात वेधक ठरते आहे.

मिनी डाळ मिलच्या स्टॉलवरही गर्दी केली होती. दोन दिवसांत शेतकऱ्यांनी ७८ हजार रुपये किमतीच्या दोन मिल विकत घेतल्या असून अजून दहा शेतकरी मिल घेण्याच्या तयारीत आहेत.

नवीन हार्वेस्टर, ट्रॅक्टरची चावी प्रदान

‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात माजी आमदार कल्याणराव काळे यांच्या हस्ते शेतकरी अन्सार हसन व इम्रान शेख (पाडळी, ता. खुलताबाद) यांना नव्या कोऱ्या स्वराज हार्वेस्टरची चावी देण्यात आली.

या वेळी ‘राज एजन्सीज’चे राज महाजन, स्वराज कंपनीचे अधिकारी मंगेश वानखेडे, ‘अॅग्रोवन’चे उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले उपस्थित होते.

तसेच श्री. काळे यांच्या हस्ते ‘सोनालिका ट्रॅक्टर-डीआय ७४५ छत्रपती’ सुरेश शामराव राठोड (धोपटेस्वर जरवाडा) यांना सुपूर्द करण्यात आला. या वेळी ‘राज एजन्सीज’चे श्री. महाजन, कंपनी प्रतिनिधी गोरक्ष खेडकर, श्री. राजपूत उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com