
बुलडाणा ः जिल्ह्यात कृषी सहायक म्हणून कार्यरत असलेल्या रूपाली गायकवाड (Rupali Gaikwad) या सर्वोत्कृष्ट सुगरण ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त (International Millet Year) त्यांनी ज्वारी, बाजरी (Pearl Millet), नाचणी (Ragi), राळा, भगर व राजगीऱ्यासह इतर तृणधान्यांपासून विविध पदार्थ बनवले. त्यांच्या या कलागुणांचे मुख्य सचिव (कृषी) एकनाथ डवले (Eknath Dawale) यांनी कौतुक करीत गौरव केला.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. डवले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. तृणधान्यापासून विविध पदार्थ बनवतानाच्या रेसिपी यू- ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गायकवाड यांनी सर्वत्र शेअर करीत तृणधान्याची प्रचार, प्रसिद्धी करण्याचे काम केले. या बद्दल मुख्य सचिव डवले यांनी गौरवोद्गार काढले.
जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.
डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या कृषी प्रदर्शनामध्ये पौष्टिक तृणधान्याचे विविध पदार्थ तयार करीत मांडले होते. रूपाली गायकवाड या ‘रूपाली फूड कल्चर’ हे यूट्यूब चॅनेलसुद्धा चालवत असून त्यामध्ये पौष्टिक तृणधान्याचे, रानभाज्यांचे तसेच फळ प्रक्रिया, शेतमाल साठवण असे उपयुक्त ३०० पेक्षा अधिक व्हिडीओ त्यांनी शेअर केले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.