
Pune ZP News : जिल्हा परिषदेने यंदा घनकचरा व्यवस्थापनावर (Solid Waste Managment) अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणजे येत्या १ मेपासून जिल्हा परिषदेमार्फत (Pune ZP) सर्व गावांमध्ये कचरामुक्त अभियान राबविण्यात येत आहे.
गाव कचरामुक्त आवश्यक करण्यासाठी प्रसिद्धी गावपातळीवर करण्यात येईल. त्यामध्ये जनजागृती, कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई यांचा समावेश आहे. या संदर्भात ग्रामसभेत किंवा मासिक सभेत याची माहिती ग्रामपंचायतीने द्यावी.
कचरामुक्त अभियानासाठी स्वच्छ भारत मिशन, १५ वा वित्त आयोग, ‘मनरेगा’, राष्ट्रीय बायोगॅस व खतव्यवस्थापन कार्यक्रम, जिल्हा वार्षिक योजना, कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व, नावीन्यपूर्ण योजना, लोकप्रतिनिधींचा विकास निधी, ग्रामपंचायत निधी व जिल्हा परिषद निधीतून खर्च करावा.
निधी खर्च करताना त्या त्या योजनेशी निगडित शासन निर्णयात नमूद अटी, शर्तींचे व निकषांचे पालन करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक राहील. ‘‘शहरालगतच्या तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असणाऱ्या ग्रामपंचायतींनी गावस्तरावर कचरा संकलन, वर्गीकरण, वाहतूक व त्यावर प्रक्रियेसाठी बाह्य संस्था किंवा कंपन्यांची निवड करावी.
त्यासाठी संबंधित संस्थेला प्रकल्प देखभाल दुरुस्ती, मनुष्यबळ वेतन यासाठी प्रतिकुटुंब शुल्क आकारणी करण्यासाठी आरोग्य कर किंवा इतर कर या खाली मासिक किंवा वार्षिक दर ग्रामसभेत ठरवून अंतिम करावेत,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.