
पुणे : जिल्हा परिषदेने (Zilla Parishad) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील उमेदवारांना अभ्यासिका (Librarie) उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यात १२ अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
शाहू-फुले-आंबेडकर ग्राम अभ्यासिकांपैकी दहा अभ्यासिकांना जिल्हा परिषदेच्या सेस फंड तर दोन अभ्यासिकेसाठी जिल्हा नियोजनकडून निधी देण्यात आला. या अभ्यासिकेच्या ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षांबरोबर अवांतर वाचनासाठी देखील पुस्तके उपलब्ध असतील. चार लाख रुपये किमतीची पुस्तके समाजकल्याण विभागाकडून अभ्यासिकांना दिले जाणार आहेत.
उमेदवारांना सर्व सुविधा गावात मिळाली तर सोईस्कर ठरेल या उद्देशाने अभ्यासिकांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव, कळूस, भोर तालुक्यातील केंजळ, वेल्हे, आंबेगावमधील निरगुडसर, दौंडमधील खुटबाव, हवेलीतील लोणीकंद, शिरूरमधील न्हावरा, बारामतीतील सुपा, इंदापूरातील अंथुर्णे, भिगवण, पुरंदरमधील वाल्हा अशा पद्धतीने १२ गावांत १२ अभ्यासिका तयार करण्यात येणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.