नांदेड जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टरचे नुकसान

अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन सुमारे ५ लाख ३३ हजार ३८४ शेतकऱ्यांच्या २ लाख ९७ हजार ४३२.१७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain Nanded) पूर परिस्थिती निर्माण होऊन सुमारे ५ लाख ३३ हजार ३८४ शेतकऱ्यांच्या २ लाख ९७ हजार ४३२.१७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. यात १ हजार ४२९ हेक्टर क्षेत्रातील जमिनी खरडून (Land Damage) नुकसान झाले. यापैकी एक लाख ४७ हजार ६७ शेतकऱ्यांच्या ८१ हजार ९४३ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित क्षेत्राचे पंचनामे लवकर पूर्ण होतील, नुकसानग्रस्तांवर अन्याय होणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत अतिवृष्टीची संभावना लक्षात घेऊन मंडळनिहाय महसूल यंत्रणांना दक्षतेचे आदेश दिले होते. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व कृषी विभागाचे अधिकारी हे प्रत्येक मंडळनिहाय प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करीत आहेत. सदर पीक नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यासाठी महसूल विभागातील ४३९ तलाठी, कृषी विभागातील ६४३ कृषी सहाय्यक व जिल्हा परिषद विभागातील ८८४ ग्रामसेवक ही टीम प्रत्यक्ष बांधावर जाऊन युद्धपातळीवर काम करीत आहेत.

Crop Damage
राज्यात Heavy Rain, Flood मुळे पिकांना फटका | Crop Damage|Agrowon | ॲग्रोवन

आत्तापर्यंत १ लाख ४७ हजार ६७ एवढ्या शेतकऱ्यांचे ८१ हजार ९४३ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिले. जिल्ह्यात पाच लाख ३३ हजार ३८४ शेतकऱ्यांची जिरायती बाधित क्षेत्र दोन लाख ९४ हजार ५८२ हेक्टर एवढे आहे. बागायत बाधित क्षेत्र दोन हजार ८१६ हेक्टर आहे. फळपीक बाधित क्षेत्र ३४.१७ हेक्टर आहे. एकूण बाधित क्षेत्र दोन लाख ९७ हजार ४३२.१७ हेक्टर आहे. शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र एक हजार ४२९ हेक्टर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Crop Damage
Crop Damage : दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली

तालुकानिहाय नुकसान

तालुका...बाधित शेतकरी...एकूण नुकसान

नांदेड...१५,७००...९,७२४

अर्धापूर...२१,५००...११,१५१

कंधार...४४,९६५...२४,११५

लोहा...४१,२००...२२,८००

देगलूर...३२,४००...१८,४७४

मुखेड...२१,३००...८,५२०

बिलोली...३२,११४...१५,५५७

नायगाव...४६७८८...१४,१२५

धर्माबाद...२०,७४८...१२,०००

उमरी...२१,२६०...११,०७०

भोकर...४०,९५०...२५,१८०

मुदखेड...३०,१०७...६,९७३

हदगाव...५२,४३१...२६,४४३

हिमायतनगर...३३,२१५...२६,४०२

किनवट...५४,५०३...४८,८३२

माहूर...२४,२०३...१६,०६६

अतिवृष्टीचे प्रमाण मोठे

जिल्ह्यातील ९३ महसूल मंडळांपैकी ८० महसूल मंडळातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ८० महसूल मंडळांपैकी ६१ महसूल मंडळात २ वेळेस, ३२ महसूल मंडळात ३ वेळेस, १२ महसूल मंडळात ४ वेळेस, ३ महसूल मंडळात ५ वेळेस, तर एका महसूल मंडळात ६ वेळेस अतिवृष्टी झाली आहे. याचबरोबर ९ जुलै रोजी ३३ मंडळात, १० जुलै रोजी १४ मंडळात, १३ जुलै रोजी ७९ मंडळात, १४ जुलै रोजी ३६ मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com