Nilwande Canal : निळवंडे कालव्यांना गती द्या

वाळूअभावी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व निळवंडे धरण ऊर्ध्व कालव्यांच्या कामांना विलंब होत आहे. त्यासाठी हरित लवाद व सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार खाणपट्टे चालवून या कामासाठी वाळू देण्यात येईल.
Irrigation
IrrigationAgrowon

नगर ः वाळूअभावी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व निळवंडे धरण (Nilwande Dam) ऊर्ध्व कालव्यांच्या कामांना (Canal Work) विलंब होत आहे. त्यासाठी हरित लवाद व सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार खाणपट्टे चालवून या कामासाठी वाळू देण्यात येईल.

Irrigation
Irrigation : रब्बी सिंचनाकरिता काटेपूर्णातून पाणी सोडले

अवैध खासगी खाणपट्ट्यांनाही आळा घालण्यात येणार आहे. संबंधित ठेकेदारांना मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्यामुळे कालवे व रस्त्यांची कामे विहित वेळेत व गतीने पूर्ण करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या, अशी माहिती महसूलमंत्री, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

Irrigation
Agriculture Irrigation : उजनीतून शेतीसाठी २० जानेवारीनंतर पाणी

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निळवंडे प्रकल्प कामकाज व गौणखनिज या विषयांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, की निळवंडे प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने या कामांसाठी मुबलक प्रमाणात गौणखनिजाची आवश्यकता असल्याची बाब समोर येत आहे. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना पुरेशा प्रमाणात गौणखनिज उपलब्धतेसाठी प्रशासनाकडून खाणपट्टयांची परवानगी देण्यात आली आहे.

स्थानिक स्टोन क्रशरच्या माध्यमातून खडी व इतर खनिज उपलब्ध करून घेण्यात यावे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या गौणखनिजाची वाहतूक व साठवणूक त्या-त्या कंत्राटदारांनीच करावयाची आहे. गौण खनिजाचा इतर कामांसाठी अथवा अवैध वाहतूक होऊ नये, यासाठी परवानगी देताना केवळ या प्रकल्पासाठीच परवानगी दिली असल्याचे स्टीकर्स वाहनावर लावण्याबरोबरच जीपीएस व बारकोड प्रणालीचाही उपयोग करण्यात यावा, असे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com