New Crop Verity : आठ वाणं, १२ कृषी यंत्रांसह २०७ तंत्रज्ञान शिफारशी मान्य

संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीने आठ नवीन वाणं, १२ नवीन कृषी यंत्रे आणि २०७ उर्वरित तंत्रज्ञानविषयक शिफारशींवर शिक्कामोर्तब केले. त्यांची अंमलबजावणी शेतकऱ्‍यांनी करावी, असे आवाहन शुक्रवारी (ता. १६)आयोजित बैठकीत करण्यात आले.
BSKKV
BSKKVAgrowon

दापोली, जि. रत्नागिरी ः संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीने आठ नवीन वाणं (New Crop Verity), १२ नवीन कृषी यंत्रे (Agriculture Machinery) आणि २०७ उर्वरित तंत्रज्ञानविषयक शिफारशींवर शिक्कामोर्तब केले. त्यांची अंमलबजावणी शेतकऱ्‍यांनी करावी, असे आवाहन शुक्रवारी (ता. १६)आयोजित बैठकीत करण्यात आले.

BSKKV
Sugarcane Verity : कोकणात उसाच्या दोन जाती ठरल्या सरस

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये ५० व्या कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचा समारोप शुक्रवारी (ता. १६) झाला. यामध्ये सहभागी झालेल्या चार कृषी विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. तसेच नवीन वाणांच्या शिफारशी केल्या.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ‘फुले पूर्वा (२३७१)’ हे वाण न लोळणारे व काढणीस सुलभ, भारी जमिनीसाठी कोरडवाहू लागवडीसाठी उपयुक्त असे हे वाण राज्यासाठी प्रसारित केले आहे. मूग पिकाच्या ‘फुले सुवर्ण’ या वाणाने खरीप हंगामात अधिक उत्पादन दिले आहे. प्रचलित वाणापेक्षा ते सरस आहे. ते पश्‍चिम महाराष्ट्रातील खरीप क्षेत्रासाठी शिफारसीत झाले आहे.

BSKKV
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

‘फुले राजन’ उडीद हे पश्‍चिम महाराष्ट्रासाठी शिफारसीत झाले आहे. ‘भुरी’, ‘पिवळा मोझॅक’ रोगासाठी ते प्रतिकारक आहे. ‘फुले विराज’ राजमा हे फिक्कट पांढऱ्या रंगावर तपकिरी रंगाच्या छटा असलेले वाण पश्‍चिम महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी आहे. ‘फुले ऊस १५०१२ (एम.एस. १७०८२) हे वाण मध्यम कालावधीत पक्व होणारे आहे. आडसाली, पूर्व आणि सुरु हंगामात पश्‍चिम महाराष्ट्रात लागवडीला ते पूरक आहे.

BSKKV
Crop Verity : ‘वनामकृवि’च्‍या तीन वाणांचा राष्ट्रीय राजपत्रात समावेश

दापोलीच्या ‘कोकण सात्त्विक वरी आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ‘एमएयुएस ७३१’ हे सोयाबीन वाणही प्रसारणासाठी सज्ज झाले आहे. सात्त्विक वरी’ ११८ दिवसांत तयार होते. ‘एमएयुएस ७३१’ हे सोयाबीन वाण स्थानिक व राष्ट्रीय तुल्यबळ वाणांपेक्षा अधिक उत्पादन देणार आहे.

हे वाण मराठवाडा विभागातील लागवडीसाठी आहे. ते ९६ दिवसांत तयार होणारे असून हेक्टरी २३ क्विंटल उत्पादन देऊ शकते. मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ‘परभणी शक्ती’च्या खरीप ज्वारीच्या अधिक चाचण्या घेऊन समितीच्या पुढील बैठकीत त्याचा प्रस्ताव सुचविण्यात आला. करक्युमिनचे प्रमाण आणि अधिक उत्पादन देणाऱ्या ‘फुले हरिद्रा’ या हळदीच्या वाणाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

राहुरीच्या डॉ. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, परभणीच्या डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, तसेच डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. एस. एस. माने आदी संशोधन संचालक आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर उपस्थित होते.

मान्यता मिळालेली आठ वाणं अशी...

- रब्बी ज्वारीसाठी ‘फुले पूर्वा (२३७१)’

- खरीप मुगासाठी ‘फुले सुवर्ण.

- खरीप राजमासाठी ‘फुले विराज’

- उडदासाठी ‘फुले राजन’

- उसासाठी ‘फुले ऊस १५०१२ (एम.एस. १७०८२)

- हळदीचे ‘फुले हरिद्रा’

५१ वी बैठक मे २०२३ ला राहुरीत

संयुक्त समितीच्या बैठकीत कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी अनेक अडचणी मांडल्या. खर्चासाठी असलेल्या सरकारी निर्बंधांमुळे राज्यातील कृषी विद्यापीठांच्या संशोधनाला खीळ बसत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच यावेळी समितीची ५१ वी बैठक राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात मे २०२३ मध्ये होणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com