Vinayak Mete : विनायक मेटे यांचे अपघाती निधन

मराठा आरक्षण बैठकीसाठी बीडवरून मुंबईकडे जाताना त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.
Vinayak Mete Death
Vinayak Mete DeathAgrowon

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढाईतील अग्रणी नेते आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे रविवारी (ता.१४) पहाटे पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघाती निधन झाले. (Vinayak Mete Accidental Death)

मराठा आरक्षण बैठकीसाठी बीडवरून मुंबईकडे जाताना त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. त्यानंतर त्यांना तासभर मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अंगरक्षक या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. तर चालक किरकोळ जखमी आहे.

Vinayak Mete Death
Soybean : देशात ४० लाख टन सोयाबीन शिल्लक?
Vinayak Mete Death
Soybean Rate : सोयाबीनला यंदाही चांगला दर मिळणार

मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी चार वाजता सह्याद्री अतिथीग्रहावर बैठक ठेवण्यात आली होती. मात्र, तिची वेळ बदलून दुपारी १२ वाजता ठेवण्यात आली. या बैठकीला मेटे शनिवारी (ता.१३) रात्रीच निघाले होते. पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या वाहनाला माडप बोगद्याजवळ अपघात झाला. त्यात त्यांना गंभीर इजा झाली. सुमारे तासभर त्यांना मदत मिळाली नाही. सहाच्या सुमारास त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले.

मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच सर्वपक्षीय नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार उदयनराजे, माजी खासदार संभाजीराजे यांच्यासह अनेक नेते रुग्णालयात आले.

मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला. त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल केले. अनेक कार्यकर्ते ओक्साबोक्शी रडू लागले. रायगड, ठाण्यासह पुणे आणि मुंबईतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुग्णालय आणि निवासस्थानी जमा झाले होते.

अपघातातून बचावलेला चालक एकनाथ कदम याने वेळेत मदत न मिळाल्याने मेटे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी सात पथके तैनात केली आहेत. चालक एकनाथ कदम याला पोलिसांनी ताब्यता घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, मेटे यांच्या पार्थिव पार्थिव बीड येथे नेण्यात आले. आज (ता. १५) दुपारी साडेतीननंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे कळते.

विनायक मेटे यांच्या निधनाने शिवस्मारक, मराठा आरक्षण तसेच महाराष्ट्रातील इतर विषयांकरिता आंदोलन करणारा एक बुलंद आवाज हरपला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो. मेटे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो, हीच प्रार्थना.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

अतिशय संघर्षातून आयुष्य जगत, गरिबीतून दिवस काढत मेटे यांनी आपले आयुष्य उभे केले. समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देताना मागास भागाचा विकास आणि मराठा समाजाचे कल्याण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते आणि त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष उभारला.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com