Leopard Attack
Leopard AttackAgrowon

Leopard Attack : बिबट्या-मानव संघर्षातून होणारे अपघात टाळता येतात

आदिवासींना मानव वन्यप्राणी संघर्ष नवा नाही, परंतु काळानुसार मानव आणि वन्य प्राणी यांची वागण्याची परिभाषा बदलली असून बिबट्या हा प्राणी एकटा राहणारा, रात्री फिरणारा, घाबरट असून माणसाला टाळणारा असा प्राणी आहे.

Leopard Attack News चास, ता. खेड ः आदिवासींना (Tribal) मानव वन्यप्राणी संघर्ष नवा नाही, परंतु काळानुसार मानव आणि वन्य प्राणी यांची वागण्याची परिभाषा बदलली असून बिबट्या (Leopard) हा प्राणी एकटा राहणारा, रात्री फिरणारा, घाबरट असून माणसाला टाळणारा असा प्राणी आहे.

Leopard Attack
Leopard Attack : टेंभोली गावात बिबट्याचा वावर?

मात्र अन्नाचा शोधार्थ तो मानवी वस्तीकडे फिरकु लागला असून सावधानता बाळगल्यास बिबट्या व मानव संघर्षातून होणारे अपघात टाळता येऊ शकतात, असे मत रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे वन्यजीव अभ्यासक नचिकेत उत्पात यांनी भोरगिरी (ता. खेड) येथे व्यक्त केले.

Leopard Attack
Junnar Leopard News: जुन्नरला नागरी वस्तीतील पाचवा बिबट्या जेरबंद

एसएम सुपे मेमोरियल फाउंडेशन, महाराष्ट्र शासन वनविभाग, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य विभाग, यांच्या संयुक्त सहभागाने बिबट्याचा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले लक्ष्मण वनघरे यांच्या स्मरणार्थ मानव वन्यप्राणी संघर्ष टाळणे या विषयावरील चर्चासत्र भोरगिरी येथे पार पडले.

याप्रसंगी अभ्यासक नचिकेत उत्पात व श्रीनाथ चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी एस.एम सुपे मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष सुपे, वन विभागाचे परिमंडळ अधिकारी चेतन नलावडे, वनपाल कौशल्या पवार, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याचे जे. बी. सानप, वनपाल ए. ए. भालेकर व लीलावती नेत्रालय चे डॉक्टर राहुल जोशी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com