मेंढीपालनासाठी बालकांकडून वेठबिगारी करणाऱ्यांवर कारवाई

कुप्रथेस थारा न देण्याचे जिल्हाधिकऱ्यांचे आवाहन
Action against those who are being bullied by children for sheep rearing
Action against those who are being bullied by children for sheep rearingAgrowon

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मौजे उभाडे गावातील काही बालके जिल्ह्याबाहेरील ठिकाणी खासगी व्यक्तींकडे मेंढीपालनाचे (Sheep Rearing) काम करीत असल्याचे मागील काही दिवसांत प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून संबंधित व्यक्तींविरुद्ध वेठबिगारी प्रतिबंध कायदा व बालकामगार अधिनियम १९८६ सुधारित २०१७ च्या कलम ३७४ प्रमाणे पोलिस विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

Action against those who are being bullied by children for sheep rearing
शेतकरी नियोजन : मेंढीपालन

जिल्ह्यातील आणखी काही बालके, किशोरवयीन मुले बेपत्ता असल्याची व मुलांकडून मेंढीपालन, शेतीकामे व इतर वेठबिगारी स्वरूपाची कामे काही व्यक्तींकडून, आस्थापना मालकांकडून करून घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. ज्यांच्याकडे १८ वर्षांखालील बालके, किशोरवयीन मुले कामे करीत असतील त्यांनी त्यांच्याकडे कामे करीत असलेल्या बालकांना, किशोरवयीन मुलांना तत्काळ संबंधित मुलांच्या पालकांकडे सुखरूप स्वाधीन करावे. जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांकडून संयुक्त तपासणी आयोजन करून अशा बेपत्ता बालकांसंबंधी चौकशी करण्यात येणार आहे. तसेच अशा वेठबिगारीची माहिती नागरिकांनी दिल्यास माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली.

संशयित मुले, बालकांबाबत माहिती कळवा

जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील बालके व किशोरवयीन मुलांकडून जिल्ह्याबाहेर वेठबिगारीची कामे करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली असून नागरिकांनी वेठबिगारीसारख्या कुप्रथेस प्रोत्साहन देऊ नये. तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरात अशी संशयित बालके, किशोरवयीन मुले असल्यास त्याबाबतची माहिती महसूल, पोलिस, आदिवासी व कामगार विभागांना द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com