शेतीशाळांसाठी साहित्याची एकत्रित खरेदी केल्यास कारवाई

चालू हंगामात विविध योजनांतर्गत राबविल्या जाणाऱ्या शेतीशाळेमध्ये प्रशिक्षण साहित्य व इतर करावयाच्या खर्चाबाबत त्यांनी स्पष्ट सूचना केल्या आहेत.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon

अकोला ः राज्यात महाडीबीटी (MahaDBT) कार्यान्वित असतानाही कृषी विभागामार्फत (Agriculture Department) विविध योजनांतर्गत (Agriculture Scheme) राबवल्या जाणाऱ्या शेतीशाळांसाठी (Farm School) लागणारे साहित्य एकत्रितरीत्या काही तालुका किंवा जिल्हास्तरावरून सरसकटपणे खरेदी केले जाते. या खरेदीच्या माध्यमातून वरकमाईचा फंडा सुरूच असल्याची वस्तुस्थिती आहे. खरेदीबाबतचे प्रकरण कुठल्याही जिल्ह्यात उघडकीस आल्यास संबंधितांविरुद्ध प्रशासकीय कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कृषी आयुक्तालयातील विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील यांनी याबाबत पत्र काढले आहे.

Department Of Agriculture
Agriculture Implements : दुचाकीचलित शेती अवजारे

चालू हंगामात विविध योजनांतर्गत राबविल्या जाणाऱ्या शेतीशाळेमध्ये प्रशिक्षण साहित्य व इतर करावयाच्या खर्चाबाबत त्यांनी स्पष्ट सूचना केल्या आहेत. क्रॉपसॅप संलग्न शेतीशाळा राबविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना व शेतीशाळा प्रमाणभूत पद्धती तयार करण्यात आलेली आहे. असे असतानाही काही ठिकाणी तालुका किंवा जिल्हा स्तरावरून एकत्रित खरेदी जाते. अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने खरेदी करून संबंधित साहित्य शेतीशाळांमध्ये लाभार्थ्यांच्या माथी मारल्या जाते. वरिष्ठांनीच खरेदी करून संबंधित किट पाठविल्याने कृषी सहायक किंवा इतर स्थानिक कर्मचारी थेट बोलत नाही. परंतु या खरेदीच्या माध्यमातून लाभ उठवलेला असल्याची खमंग चर्चा कृषी खात्यात सातत्याने होत असते.

Department Of Agriculture
‘पोकरा’अंतर्गत ६७ कोटींची रक्कम  ‘डीबीटी’द्वारे शेतकऱ्यांना वितरित 

या हंगामासाठी शेतीशाळा सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी किटची अशीच थेट खरेदीसुद्धा झालेली आहे. हा प्रकार राज्यात काही ठिकाणी समोर आल्याने आता पाटील यांनी थेट पत्र काढत कारवाईचा इशारा दिला. यामुळे अनेक जण अडचणीत येऊ शकतात. या पत्रानुसार प्रशिक्षण साहित्याची एकत्रित खरेदी करून खरेदीदाराला बिले दिलेली असल्यास तो खर्च अमान्य केला जाणार आहे. तसेच असा प्रकार कुठल्याही तालुक्यात किंवा जिल्ह्यात निदर्शनात आल्यास संबंधितावर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.

किट पोहोचल्या

काही जिल्ह्यात शेतीशाळांसाठी एकत्रित खरेदी करून संबंधित साहित्याची किट तालुक्यांना पोहोचविण्यात आलेली आहे. ही किट शेतीशाळांमधील लाभार्थ्यांना वितरितही झाली. वास्तविक एकत्रित खरेदीबाबत कुठल्याही सूचना नसताना नियमांची पायमल्ली अनेक ठिकाणी झाल्याचे सत्य आहे. स्मार्ट प्रकल्पातही अशीच खरेदी पद्धत रूढ केल्या जात आहे. त्याही प्रकल्पाकडे सुरुवातीपासूनच लक्ष देण्याची गरज आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com