Coal : अवैध कोळसा भट्टीवर कारवाई

कऱ्हावागज (ता. बारामती) येथील अवैध कोळशाच्या भट्टीवर कारवाई करण्यात आली. बारामतीच्या वनपरीक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Coal
Coal Agrowon

मोरगाव, जि. पुणे ः कऱ्हावागज (ता. बारामती) येथील अवैध कोळशाच्या भट्टीवर (Illegal Coal Furnace) कारवाई करण्यात आली. बारामतीच्या वनपरीक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर (Shubjangi Lonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Coal
कोळसा उत्पादक प्रदेशामध्ये कमी पावसाचा अंदाज

गस्त घालत असताना खासगी शेतजमिनीमध्ये प्रोसोपिस प्रजातीपासून तयार करण्यात आलेला कोळसा हा टेम्पोमध्ये भरत असताना जागेवरच पकडून संबंधित वाहनचालकाकडे कोळसा वाहतुकीसाठी लागणारा परवाना नसल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून सदर वाहन जप्त करण्यात आले. याशिवाय मौजे लोणी भापकर येथील वनक्षेत्रालगत असणाऱ्या खासगी शेत जमिनीमध्ये विनापरवानगी कोळसा भट्ट्या लावून कोळसा तयार करीत असताना आढळून आल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही करवाई पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, पुण्याचे सहायक वन संरक्षक मयूर बोठे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनक्षेत्रामध्ये कुठेही काहीही अवैध काम आढळून आल्यास ०२११२-२४४४५० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन शुभांगी लोणकर यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com