Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांच्या मदत निधी वाटपात हयगय करणाऱ्यांवर कारवाई

जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या शेती पिकांचे नुकसानीकरिता वाढीव दराने प्राप्त निधी अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार यांना वितरित करण्यात आलेले आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीसारख्या (Natural Calamity) अतिसंवेदनशील विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या व निधी वाटप (Crop Damage Compensation) करण्याच्या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार (Disaster Management Act) कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत.

Crop Insurance
Soybean Crop Damage : वाशीममध्ये पावसाचा सोयाबीनला फटका

जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या शेती पिकांचे नुकसानीकरिता वाढीव दराने प्राप्त निधी अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार यांना वितरित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात निधी वाटपाची कार्यवाही पूर्ण व्हावी व नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने शासनाची मदत मिळावी याकरिता तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना जिल्ह्यातील बाधित गावांचे समप्रमाणात वाटप करून याद्या तयार करून निधी वाटप करण्याचे कळविले आहे.

Crop Insurance
Crop Damage : अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी साडेतीन कोटी रुपये

राज्य ग्रामसेवक युनियन संघटना व महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना यांनी सदर कामावर बहिष्कार असल्याचे निवेदनाद्वारे कळविले आहे. ग्रामसेवक व कृषी सहायक ह्यांची कृती अशोभनीय आहे. कामकाज टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊन जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण तसेच पुढील कालावधीत दिवाळीचा सण असल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना वेळेच्या आत शासनातर्फे प्राप्त मदतनिधी वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. हे काम तत्परतेने पूर्ण करून घेण्यासाठी तालुकानिहाय नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com