Agriculture Inputs : अनधिकृत निविष्ठा विक्रेत्यांवर होणार फौजदारी

Latest Agriculture News : खरीप हंगामात अनधिकृत निविष्ठांचा पुरवठा आणि विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी दिला आहे.
Agriculture Inputs
Agriculture InputsAgrowon

Bhandara News : खरीप हंगामात अनधिकृत निविष्ठांचा पुरवठा आणि विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी दिला आहे.

पीक संरचनेतील बदल व खत वापराच्या शिफारशीप्रमाणे जिल्ह्यासाठी एकूण ८९ हजार ३१८ टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली असून, ८० हजार १८० टन खताचे वाटप व २८ हजार ३५० बॉटल नॅनो युरिया शासनाकडून प्राप्त झाला आहे.

Agriculture Inputs
Agriculture Inputs : ‘सक्‍सेस बीज सायन्स प्रायव्हेट लिमिटेड’ शेती निविष्ठा उत्पादनातील एक विश्‍वासाचं नाव

रब्बीतील सुमारे २९ हजार ५२६ टन साठा जिल्ह्यामध्ये शिल्लक आहे. जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात बियाणे मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने २.०२ लाख हेक्टरचे नियोजन केले आहे.

Agriculture Inputs
Agriculture Inputs : अप्रमाणित कृषी निविष्ठांसाठी हवे फास्ट ट्रॅक कोर्ट

यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भात बियाणांचे यंदा १.८८ लाख हेक्टरवर लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी ४५ हजार १८३ क्विंटल बियाणे लागणार असून, सोयाबीनसाठी ६३१ क्विंटल व तूर पिकासाठी ४८८ क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

बियाणे, खते व कीटकनाशके यांचा काळाबाजार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी व गुणवत्ता पूर्ण बियाणे व खते शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी जिल्हास्तरावर १ व प्रती तालुका १ याप्रमाणे एकूण ८ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

खत व बियाणे विक्रेत्यांच्या गोडाउनच तपासणी करण्यात येणार आहे. बियाणे व खतांच्या गुणवत्तेतबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. यासाठी जिल्ह्यात कोणीही अनधिकृत अथवा विना परवाना असलेले बियाणे विक्रीस आणू नये.

अन्यथा, संबंधित विक्रेते, कंपनी अथवा असे कृत्य करणाऱ्या कोणत्याही खासगी एजंटविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी दिला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com