Right To Information : माहिती अधिकारात माहिती मागणारे कार्यकर्ते ठरवले ‘त्रासदायक व्यक्ती’

साखर आयुक्तालयाकडे साखर उद्योगातील माहिती मिळावी यासाठी सातत्याने माहिती अधिकारात जास्ती अर्ज केले. साखर आयुक्त कार्यालय हे राज्य पातळीवरील कार्यालय आहे.
RTI
RTIAgrowon

नगर : साखर आयुक्तालयाकडे (Sugar Commissionerate) साखर उद्योगातील (Sugar Industry) माहिती मिळावी यासाठी सातत्याने माहिती अधिकारात (Right To Information Act) जास्ती अर्ज केले. साखर आयुक्त कार्यालय हे राज्य पातळीवरील कार्यालय आहे. माहिती अधिकारातून सतत अर्ज करत आहेत. त्रास देण्याच्या हेतूने अर्ज करत असल्याने कार्यालयाचा वेळ वाया जात असल्याचे सांगत वांगदरी (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील शेतकरी व माहिती अधिकार कार्यकर्ते भाऊसाहेब पवार यांना साखर आयुक्तालयाने ‘त्रासदायक व्यक्ती’ म्हणून घोषित केले आहे.

RTI
Soybean Market : अमेरिकेतील सोयाबीनची स्थिती काय ?

यापुढे त्यांच्या कोणत्याही अर्जाला उत्तर दिले जाणार नाही, असा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद केले आहे. माहिती अधिकारात अधिक अर्जातून माहिती मागितली म्हणून एखाद्या व्यक्तीस त्रासदायक व्यक्ती म्हणून घोषित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

वांगदरी (ता. श्रीगोंदा) येथील भाऊसाहेब पवार हे शेतकरी माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. त्यांनी साखर आयुक्तालयाला माहिती अधिकारात या वर्षात ४९ अर्ज करून वेगवेगळ्या बाबींची माहिती मागवली.

RTI
Cotton Rate : कापसाला देशभरात किती दर मिळाला?

ते सर्व अर्ज निकाली काढले असल्याचे नमूद करत अर्जात कारखानास्तरावरील संचालक मंडळ, विशेष सभा यांच्या इतिवृत्ताची माहिती, सहकार कायदा व त्याखालील नियम, कारखाना व साखर आयुक्त कार्यालय यांच्यामधील पत्रव्यवहार, साखर कारखान्याकडून जमा होणारी वठनावळ निधीचा तपशील, उसापासून साखरेचे व मळीचे होणारे उत्पादन व त्यावरील खर्च, एफआरपी अहवालाच्या प्रति, राज्यातील खांडसरी, गुऱ्हाळाची संख्या व त्यांना अभ्यास गटात प्रतिनिधित्व नसणे, विकास शाखेचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, कारखान्यांना दिलेल्या गाळपाच्या परवान्याच्या प्रति आदीबाबत अर्जात माहिती मागवली. राज्यातील गुऱ्हाळांची संख्या व त्यांना अभ्यास गटात प्रतिनिधित्व नसणे या बाबींची आयुक्तालयात नोंद ठेवली जात नाही हे सांगूनही त्रास देण्याच्या दृष्टीने अर्ज केल्याचे दिसते.

RTI
Sugar : ब्राझीलच्या साखरेचा एप्रिलनंतर धोका

जनहित साधणारी माहिती त्यातून पुढे येत नसल्याचे दिसते. कार्यालयाकडे सतत माहिती मागवून कार्यालयाचा वेळेचा अपव्यय करत आहेत. राज्यात २०० साखर कारखाने व ३५ लाख शेतकऱ्यांचा साखर उद्योगाशी सबंध आहे. असे असताना एका व्यक्तीने अधिक अर्ज केल्याने अर्जदारास त्रासदायक व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. यापुढे त्यांच्या कोणत्याही अर्जाला उत्तर दिले जाणार नाही, असा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद केले आहे. माहिती अधिकारात अधिक अर्जातून माहिती मागितली म्हणून एखादा व्यक्तीस त्रासदायक व्यक्ती म्हणून घोषित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कोणत्या कलमानुसार आदेश काढला?

भाऊसाहेब पवार हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचार जन आंदोलन न्यासचे पुणे शहर उपाध्यक्ष आहे. त्यांनी साखर उद्योगातील अनेक बाबी माहिती अधिकारातून उघड केल्या आहे. त्यामुळे साखर उद्योगातील गैरव्यवहार उघड केल्याने या लोकांना पाठीशी घालण्यासाठी त्यांना साखर आयुक्तालयाने त्रासदायक व्यक्ती ठरवल्याचे दिसतेय. हे घटनेविरोधी आहे.

माहिती अधिकार अधिनियम २००५ व भारतीय कायद्याच्या कोणत्या कलमानुसार त्यांना त्रासदायक व्यक्ती ठरवले यांचा खुलासा करावा, अशी मागणी साखर आयुक्त कार्यालयाकडे अण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचार जन आंदोलन न्यासने केली आहे. पवार यांनी माहिती अधिकारातून केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना नागवडे कारखान्याकडून उसाचे थकीत ६३ कोटी ७९ लाख रुपये मिळाले, ७ हजार ३२६ शेतकऱ्यांना सभासदत्व मिळाले, थकीत ३०० कोटी रुपये मिळण्यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेसाठी माहिती अधिकारातूनच कागदपत्रे मिळाली, असे आयुक्तालयाला दिलेल्या पत्रात नमूद आहे

मी माहिती अधिकारातून माहिती मागितली व त्यातून शेतकऱ्यांसाठी अनेक बाबी उघड केल्या. माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार प्रत्येक नागरिकाचा माहिती मागणे हा हक्क आहे. मात्र साखर उद्योगातील गैरव्यवहार उघड होईल या भीतीने साखर आयुक्तालयाने असे पत्र काढले आहे. मुळात साखर आयुक्तालयाला असा अधिकार नाही. माहिती अधिकाराची ही गळचेपी आहे.
भाऊसाहेब पवार, माहिती अधिकारी कार्यकर्ते व शेतकरी, वांगदरी, ता. श्रीगोंदा, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com