अडते असोसिएशनच्या कार्यकारिणीला मंजुरी नाही

गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनच्या कार्यकारिणीला सहाय्यक धर्मादाय आयुक्त रेश्मा पुणसे यांनी तात्पुरती मंजुरी देण्यास नकार दिला.
APMC Pune
APMC Pune Agrowon

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (Pune APMC) श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड (Market Yard Pune) अडते असोसिएशनच्या कार्यकारिणीला सहाय्यक धर्मादाय आयुक्त रेश्मा पुणसे यांनी तात्पुरती मंजुरी देण्यास नकार दिला.

APMC Pune
Pune APMC ; डमी अडत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

निवडणुकीबाबत बदल अर्ज प्रलंबित आहेत, तसेच विरोधकांनी प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याने बदल अर्जाला तात्पुरती मंजुरी देणेदेखील योग्य होणार नसल्याचे मत नोंदविले आहे.

APMC Pune
Soybean Rate : यंदा किती सोयाबीन उत्पादन होणार?

याबाबत माहिती विरोधी गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार अमोल घुले यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘२६ डिसेंबर २०२१ रोजी अडते असोसिएशनच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला. अनिरुद्ध भोसले यांचे पॅनेल विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दौलत हिंगे यांनी दिले. त्या आधारे भोसले गटाने सहायक धर्मादाय आयुक्तांकडे बदल अहवाल सादर केला.

त्यास विलास भुजबळ, सतीश उरसळ, बाळासाहेब उरसळ, काकासाहेब भालेराव, अनिल घुले, राजेंद्र कोरपे, युवराज काची, अमित उरसळ, दिलीप खिरीड, राहुल कोंढरे यांच्या गटाने विधितज्ज्ञ शिवराज कदम जहागीरदार यांच्यामार्फत कॅव्हेट दाखल करून हरकत घेतली होती. बदल अर्जाची सखोल चौकशी होऊन निवडणूक प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराची दखल घेऊन बदल अर्ज फेटाळावा,’’ अशी विरोधी गटाने मागणी केली होती.

निवडणुकीनंतर कामकाज करण्यासाठी तात्पुरती मंजुरी मिळावी असा अर्ज भोसले यांच्या गटाने सहायक धर्मादाय आयुक्तांना केला होता. त्यावर सुनावणी होऊन पुनसे यांनी तात्पुरती मंजुरीदेखील नाकारण्याचा आदेश दिला आहे. विरोधी गटातर्फे बदल अहवालाविरुद्ध बाजू मांडताना शिवराज कदम जहागीरदार यांना अमित टकले व शुभम नागणे यांनी साह्य केले.

विरोधी पॅनेलने निवडणुकीच्या कामकाजावर धर्मादाय आयुक्तांकडे आक्षेप घेतला होता. तर, आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे तात्पुरता स्वीकृती बदल मागितला होता. मात्र तात्पुरत्या बदलास त्यांनी नकार देण्यात आला आहे. परंतु अध्यक्ष व सचिवांनी कामकाज करू नये, असे कोठेही म्हटले नाही. तसेच निवडणूक प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाली आहे, असे म्हटलेले नाही.
अनिरुद्ध (बापू) भोसले, निवडून आलेले अध्यक्ष
अडते असोसिएशनच्या निवडणुकीत चुकीच्या प्रकारांवर आम्ही त्याच वेळी आक्षेप घेतला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. निवडणुकीचा कालावधी १३ तासांचा असताना १२ तासांचेच चित्रीकरण उपलब्ध आहे. एकत्र चित्रीकरण अपेक्षित असताना तुकड्यात चित्रीकरण देण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता मतमोजणी सुरू होणार असल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. सर्वांना बाहेर काढले. प्रत्यक्षात मात्र ५.३० वाजता मोजणी सुरू केली. त्या दोन तासांत अनेक चुकीचे प्रकार घडल्याचा आमचा संशय आहे. त्यामुळे आम्ही कॅव्हेट दाखल केले होते.
अमोल घुले, विरोधी गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com