Rahul Gandhi :भारत जोडो’ १६ नोव्हेंबरला अकोल्यात

अकोला ः राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रा १६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात येईल.
rahul gandhi
rahul gandhi agrowon

अकोला ः राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत (india) जोडो’ यात्रा १६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात येईल. दोन दिवस यात्रा जिल्ह्यात असेल. जिल्ह्यातून ४५ किलोमीटर अंतराचा प्रवास राहील. यात्रेदरम्यान राहुल गांधी विद्यार्थी, कामगारांसह १६ विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधतील, अशी माहिती काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी (ता. २) देण्यात आली.

माजी राज्यमंत्री प्रा. अजहर हुसेन व माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, समन्वयक प्रशांत गावंडे, प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनी यात्रेविषयी माहिती दिली. ‘भारत जोडो’ यात्रा १६ नोव्हेंबरला रात्री पातूर तालुक्यात येईल. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता पातूर येथील शाह बाबू हायस्कूल येथून ती बाळापूरकडे रवाना होईल. दुपारी ३.३० वाजता हिंगणा उजाडे येथे आगमन होईल. त्यानंतर बटवाडी फाटा येथे मुक्काम राहील. १८ नोव्हेंबरला सकाळी ६.३० वाजता यात्रा बुलडाणा जिल्ह्याकडे रवाना होईल. शेगाव येथे राहुल गांधी यांची सभा होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com