Godavari Project : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सर्वसाधारण आणि आदिवासी क्षेत्रातील गोदावरी नदीच्या उपनद्यांवरील आहे.
Godavari
GodavariAgrowon

नाशिक : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प (Uppar Godavari Project) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सर्वसाधारण आणि आदिवासी क्षेत्रातील गोदावरी नदीच्या (Godavari River) उपनद्यांवरील आहे. या प्रकल्पाच्या एक हजार ४९८ कोटी ६१ लाखांच्या चौथ्या सुधारित प्रकल्प अहवालास जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे नाशिक, नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील ७४ हजार २१० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

प्रकल्पात वाघाड, करंजवण, पालखेड, ओझरखेड, तिसगाव व पुणेगाव अशा सहा प्रकल्पांचा समावेश आहे. करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणे या प्रकल्पांच्या स्थिरीकरणासाठी देवसाने (मांजरपाडा) वळण योजना व इतर ११ प्रवाही वळण योजनांचा समावेश आहे. यापूर्वीच्या तीन मान्यतेनंतर आता २०१८-१९ च्या दरसूचीनुसार चौथ्यांदा प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या रकमेमध्ये १ हजार ३९४ कोटी ६ लाख रुपये कामासाठी खर्च अपेक्षित आहे.

Godavari
Godavari Project : ऊर्ध्व ‘गोदावरी’ला प्रशासकीय मान्यता

उरलेल्या १०४ कोटी ५५ लाख रुपये आनुषंगिक बाबींवर खर्च केले जातील. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या अहवालातील मुद्यांची पूर्तता आता करावी लागणार आहे. त्याचबरोबर आणखी खर्चाचा बोजा वाढेल, अशा नवीन बाबींचा समावेश सरकारच्या मान्यतेशिवाय प्रकल्पात करता येणार नाही.

Godavari
Godavari Flood : ‘गोदावरी’ला आला पूर

दरम्यान, आमदार छगन भुजबळ म्हणाले, ‘‘नाशिक जिल्ह्यांतील ११ प्रवाही वळण योजनांसाठी २०६ कोटी ५१ लाख, देवसाने-मांजरपाडा प्रकल्पासाठी ४६४ कोटी ४० लाख, वाघाडसाठी ५ कोटी ७ लाख, करंजवणसाठी ७ कोटी ७६ लाख, ओझरखेडसाठी ८ कोटी १३ लाख, पालखेडसाठी ३ कोटी ६१ लाख, तिसगावसाठी ५० कोटी सात लाख, पुणेगावसाठी १२ कोटी पाच लाख अशा एकूण ७६० कोटी ६१ लाखांच्या निधीस मान्यता मिळाली आहे.

कालवा व वितरकांच्या दुरुस्तीसाठी ६३३ कोटी ४५ लाखांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. त्यात वाघाडच्या ११ कोटी ९७ लाख, करंजवणच्या ४ कोटी ९८ लाख, ओझरखेडच्या ७३ कोटी १८ लाख, पालखेडच्या ६७ कोटी ९० लाख, तिसगावच्या ६६ लाख, पुणेगावच्या २९४ कोटी ९६ लाख, तर दरसवाडीच्या १७९ कोटी ७९ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे.’’

अपूर्ण कामे होतील पूर्ण : भुजबळ

मांजरपाडासह वळण योजनांची आणि पुणेगाव, दरसवाडी, ओझरखेड, पालखेड कालव्यांची अपूर्ण कामे पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com