Orange Project : ‘पंदेकृवि’त संत्रा पीक सुधारणा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

विदर्भाची ओळख असलेल्या संत्र्यामध्ये नवीन वाण तसेच या पिकातील गुणधर्म वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत संत्रा पीक सुधारणा प्रकल्प राबविण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
Orange Project
Orange ProjectAgrowon

अकोला ः विदर्भाची ओळख असलेल्या संत्र्यामध्ये नवीन वाण (Orange Verity) तसेच या पिकातील गुणधर्म वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत संत्रा पीक सुधारणा प्रकल्प (Orange Project) राबविण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. पाच वर्षांसाठी हा प्रकल्प आहे. यासाठी सुमारे आठ कोटी दोन लाख २० हजारांची तरतूदही मंजूर करण्यात आली आहे.

Orange Project
Nagpur Orange : ‘जी २०’मध्ये नागपुरी संत्र्याऐवजी टायगर कॅपिटल म्हणून ब्रॅण्डिंग

संत्र्यांची विदर्भात सुमारे १ लाख ४८ हेक्टरवर लागवड झाली आहे. यापैकी एक लाख १३ हजार हेक्टर क्षेत्रातून उत्पादनही सुरू आहे. विदर्भातील ११ जिल्हे मिळून दरवर्षी सुमारे १३ लाख ५६ हजार टन संत्रा फळांचे उत्पादन काढले जाते. महाराष्ट्रात नागपूर संत्रा प्रामुख्याने अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांसह जालना, नगर, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, नांदेड व जळगाव आदी जिल्ह्यांतही घेतला जातो.

Orange Project
Orange : कृषी विज्ञान केंद्राद्वारे संत्रा गट शेती कार्यक्रम

देशातून संत्र्यांची निर्यात बांगलादेश, नेपाळ, यूएई, बुरुंडी, रशिया, ओमन, नेदरलँड, सिंगापूर, स्पेन, मालदीव आदी देशांत होते. या फळपिकाची राज्यातील (सरासरी ८ ते ९ टन) उत्पादकता देशाच्या (११ ते १२ टन) तुलनेत व इतर विकसित देशांच्या (२५ ते ३० टन) तुलनेत अतिशय कमी आहे. वातावरण बदलाचे परिणाम या पिकावरही दिसून येत आहेत. त्यामुळे संत्रा पिकासाठी संशोधनात्मक कार्यक्रम राबविणे अनिवार्य आहे.

त्यानुसार ‘पंदेकृवि’ अंतर्गत तीन संशोधन केंद्रावर प्रकल्प हातात घेण्यात आला. नागपूर येथील कृषी महाविद्यालयाचा उद्यानविद्या विभाग, ‘पंदेकृवि’चा फळशास्त्र विभाग आणि काटोल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात हा प्रकल्प राबविण्याचे नियोजित आहे. या तीन ठिकाणी पाच वर्षांत संत्रा सुधारणा प्रकल्प राबवण्यासाठी आठ कोटी दोन लाख २० हजारांची तरतूद करण्याच्या महाराष्ट्र कृषी व शिक्षण संशोधन परिषदेने केलेल्या शिफारशीला बुधवारी (ता.१४) शासनाने मंजुरी दिली.

शेतकरी नवीन उत्पादनक्षम वाणांची मोठ्या प्रमाणात मागणी करीत आहेत. त्यानुसार प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले यांनी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडे सातत्याने पाठपुरावा केला. मागील दोन वर्षांपासून यावर कृषी विभागाच्या मदतीने काम होत आहे. विविध बैठका झाल्या. सुमारे एक हजार नमुने गोळा करून त्याचे विश्‍लेषण करण्यात आले. त्यात स्थानिक जातींचाही समावेश होता. या सर्व माहितीचा एकत्रित प्रकल्प कृषी विद्यापीठाचे उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई यांच्या नेतृत्वात शासनाकडे सादर करण्यात आला.

...अशा गुणधर्मांच्या वाणाचे उद्दिष्ट

सध्याच्या संत्र्याच्या जातींमध्ये आकर्षक, गर्द नारंगी रंग, साखर व आम्लाचे योग्य प्रमाण, पातळ व घट्ट साल, साधारणतः ७० ते ८० मिमी आकाराचे फळ तसेच जास्त उत्पादकता अशा प्रकारचे गुणधर्म असलेली जात विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. निधी मिळाल्याने वेगाने काम पुढे जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com