
पुणे : मावळ तालुक्यातील कार्यकाळ संपलेल्या ४ ग्रामपंचायतींवर नुकतीच प्रशासकांची (Administrator On Gram Panchayat) नियुक्ती करण्यात आली आहे. यात साळुंब्रे, डोणे, आढले व उदेवाडी या गावांचा समावेश आहे. तर पुढील महिन्यात आंबळे, शिळिंब व लोहगड या तीन ग्रामपंचायतींवर तसेच मे महिन्यात भाजे, मुंढावरे, संगिसे या तीन ग्रामपंचायतीत प्रशासकांची (Gram Panchayat Administrator) नियुक्ती करण्यात येणार आहे.
तालुक्यातील आढले ग्रामपंचायतीचा कार्यकाळ तीन जानेवारीला तर साळुंब्रे व डोणे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ चार जानेवारी रोजी संपला आहे.
त्याठिकाणी गट विस्तार अधिकारी एन.जे. ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उधेवाडी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ५ जानेवारी रोजी संपला असून त्याठिकाणी एस. के खांडेकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
याशिवाय आंबळे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी रोजी संपेल. तेथे बी. डी वायकर हे प्रशासक असतील. शिळींब ग्रामपंचायतीचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी रोजी संपेल.
त्या ठिकाणी एन.जे. ढवळे हे प्रशासक असतील. लोहगड ग्रामपंचायतीचा कार्यकाळ २२ फेब्रुवारीला संपेल. तेथे एन.जे. ढवळे हे प्रशासक असतील. भाजे, मुंढावरे व सांगिसे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ २ मे रोजी संपेल.
तेथे एस. के. खांडेकर हे प्रशासक असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लवकरच निवडणूकीची रणधुमाळी
प्रशासक नियुक्त झालेल्या या ग्रामपंचायतींमध्ये लवकरच निवडणूक घेण्यात येणार असल्याने या गावांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.
इच्छुक उमेदवार घरोघरी बैठका घेऊन मतदारांची जोडणी करत आहेत.
तर आता गावकारभारी असलेला सरपंच थेट नागरिकांमधून निवडला जाणार असल्याने भावी सरपंच आता गावातील मतदारांची जोडणी करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत.
तर अनेक इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पाहायला मिळत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.