Palkhi Mahamarg : पालखी महामार्गाची नितीन गडकरींकडून हवाई पाहणी

दोन्ही पालखी मार्ग विकसित करताना रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon

Palkhi Mahamarg महाराष्ट्रातील देहू-पंढरपूर आणि आळंदी-पंढरपूर या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या पालखी मार्गाचे (Palkhi Mahamarg) काम प्रगतीपथावर आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari) या पालखी मार्गांची हवाई पाहणी यांनी आज (ता. ११) केली. यावेळी त्यांच्यासोबत माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हेही होते.

देहू ते पंढरपूर पालखी मार्ग

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - ९६५ जी) हा देहू ते पंढरपूर असा हा १३० किमी लांबीचा असणार आहे. हा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस - बारामती - इंदापूर - अकलुज - बोंडलेपर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे असणार आहेत. तर या मार्गावर वारकऱ्यांच्या या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Nitin Gadkari
Agriculture Export : शेतीमालाची निर्यात जलदगतीने करणार : गडकरी

आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - ९६५) हा आळंदी ते पंढरपूर असा २३४ किमी लांबीचा आहे. हा महामार्ग पुणेमार्गे हडपसर (पुणे) - सासवड - जेजुरी - निरा - लोणंद - फलटण - नातेपुते - माळशिरस - बोंडले - वाखरी - पंढरपूर असा आहे. या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. या मार्गावर एकूण १२ पालखी स्थळे असून याठिकाणीही वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतील.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : राजू शेट्टींची आई जेव्हा गडकरींच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवते

दोन्ही पालखी मार्ग विकसित करताना रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.

पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com