Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon

Agriculture Department : चार वर्षांनंतर ‘आत्मा’ला मिळाले पूर्णवेळ प्रकल्प संचालक

गेल्या चार वर्षांपासून कृषी विभागाच्या कृषी तत्रंज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचा (आत्मा) कारभार प्रभारावरच सुरू होता. काही दिवसांपूर्वी कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती झाल्या.

Yavatmal News गेल्या चार वर्षांपासून कृषी विभागाच्या (Agriculture Department) कृषी तत्रंज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचा (आत्मा) कारभार प्रभारावरच सुरू होता. काही दिवसांपूर्वी कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती झाल्या. यात बुलडाणा उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांची यवतमाळ येथे आत्मा प्रकल्प संचालक म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.

प्रगत तंत्रज्ञान, नवीन प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी आत्मा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा प्रकल्प मानला जातो. अनेक योजना याच विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात. महत्त्वाचा विभाग असूनही गेल्या चार वर्षांपासून हा विभाग प्रभागावरच सुरू होता.

Department Of Agriculture
Agriculture Department Scheme : पंढरपुरातील दोन हजार शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ

शेतकऱ्यांना गरजेवर आधारित प्रशिक्षण देणे, प्रात्यक्षिके, धान्य महोत्सव आदी योजना आत्मा यंत्रणेच्या माध्यमातून राबविल्या जातात. आत्मा प्रकल्पामुळे कृषी तसेच कृषी विस्ताराच्या कार्याला गती मिळाली. हजारो शेतकऱ्यांना आर्थिक, सामाजिक प्रगती साधता आली. असे महत्त्वाचे ‘आत्मा’चे प्रकल्प संचालकांचे पद रिक्त होते.

Department Of Agriculture
Agriculture Department : कृषी अधिकाऱ्यास दुपारी पदोन्नती, संध्याकाळी निवृत्ती

रिक्तपदांचा कारभार काही दिवस उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे होता. सध्या कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर यांच्याकडे ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक पद होते. नुकत्याच कृषी विभागात बदली तसेच पदोन्नती झाल्या आहेत.

यात यवतमाळ प्रकल्प संचालक आत्मा या पदावर बुलडाणा उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांना बढती देण्यात आली आहे. पूर्ण वेळ संचालक असल्याने योजनांना गती येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com