Mumbai Port : मुरुडमध्ये आगरदांडा बंदराच्या कामाला आठवडभरात सुरुवात

दिघी पोर्ट कंपनीने स्थानिकांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची बिले प्रलंबित ठेवल्याने त्यांची आर्थिक घडी बिघडली आहे.
Mumbai Port : मुरुडमध्ये आगरदांडा बंदराच्या कामाला आठवडभरात सुरुवात

मुरूड : दिघी पोर्ट कंपनीने स्थानिकांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची बिले प्रलंबित ठेवल्याने त्यांची आर्थिक घडी बिघडली आहे. त्यांना ती बिले मिळावीत; तसेच नोकरभरतीत स्थानिक युवकांना प्राधान्य मिळावे, यासाठी दिघी बंदराचे काम थांबवण्यात आले होते; मात्र आता स्थानिकांनीच बंदर सुरू व्हावे, अशी मागणी केल्यामुळे येत्या आठवड्यात आगरदांडा युनिट वेगाने सुरू होईल, अशी ग्वाही आमदार महेंद्र दळवी यांनी दिली.

Mumbai Port : मुरुडमध्ये आगरदांडा बंदराच्या कामाला आठवडभरात सुरुवात
Crop Insurance : विमा कंपन्यांकडे दीड लाख शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तक्रारी

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आगरदांडा ग्रामपंचायत येथील इमारतीसाठी १६ लाख रुपये खर्च करून नवीन इमारत बांधण्यात आली. या इमारतीच्या उद्‍घाटन कार्यक्रमात आमदार दळवी मार्गदर्शन करताना बोलत होते. अलिबागपेक्षा मुरूडचा विकास कांकणभर सरस होईल, याकडे आपण लक्ष देणार असल्याचे दळवी यांनी सूचित केले.

या वेळी ऋषिकांत डोंगरीकर यांनी ग्रामपंचायतीला अंतर्गत रस्ते, पाणी योजना आदी विकास कामांसाठी भरघोस निधी मिळवून दिल्याबद्दल दळवी यांचे ऋण व्यक्त केले. तर यूसुफ अर्जबेगी यांनी आगरदांडा युनिट बंद पडल्याने विकास खुंटला असून ते लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली. सरपंच ऋषाली डोंगरीकर, उपसरपंच युसूफ अर्जबेगी, ऋषिकांत डोंगरीकर, विजय गिदी, सुशांत ठाकूर, संतोष पाटील, नाहिदा डावरे, प्रीती भाटकर, शांताराम हिलम उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com