Kalu River : ‘काळू’वरील धरणाला विरोध

शहरी भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी काळू नदीवर धरण बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. काळू धरण बांधल्यास पाच गावे पूर्णतः व आठ गावे अंशतः बुडणार आहेत.
Dam Issue
Dam IssueAgrowon

मुरबाड : काळू नदीवरील (Kalu River) धरणाला विरोध दर्शविण्यासाठी गुरुवारी मुरबाड तहसीलदार कार्यालय (Murbad Tehsil Office) येथे काळू धरण (Kalu River Dam) प्रकल्प संघर्ष समिती व श्रमिक मुक्ती संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

शहरी भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी काळू नदीवर धरण बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. काळू धरण बांधल्यास पाच गावे पूर्णतः व आठ गावे अंशतः बुडणार आहेत.

तर कित्येक गावांचे रस्ते पाण्याखाली जाणार आहेत. धरण बांधण्यास परवानगी देताना ग्रामसभांचे संवैधानिक अधिकार डावलण्यात आले आहेत.

मोठे धरण बांधण्‍याऐवजी लहान बंधारे बांधले तर कोणत्याही गावाला विस्थापित करावे लागणार नाही, असे सांगत ग्रामस्थांनी धरणाला विरोध दर्शविला.

Dam Issue
Ujani Dam : उजनी धरण होऊनही सीमावर्ती भाग तहानलेलाच

या वेळी आरपीआय ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे आदींची भाषणे झाली.

नंतर धरण बांधण्यास विरोध असल्याबाबत निवेदन देण्यात आले. या वेळी संतोष निमसे यांच्‍यासह तळेगाव, चासोळे, आंबिवली, झाडघर, वाकळवाडी परिसरातील ग्रामस्‍थ यावेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com