Agriculture Department : कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

महाराष्ट्र राज्य कृषिसेवा महासंघातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून सोमवारी (ता. १७) निषेध दिन पाळला.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

सोलापूर : आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांविषयी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कृषिसेवा महासंघातील (Maharashtra State Agricultural Service Federation)विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून सोमवारी (ता. १७) निषेध दिन पाळला.

Agriculture Department
Commercial Crop : व्यावसायिक पिकांत गणेश झाले ‘प्रगतिशील’ शेतकरी

महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांना यासंबंधीचे निवेदन दिले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व कृषी अधिकारी-कर्मचारी यांनी एकत्रित येत आमदार बांगर यांचा निषेधही केला.

महाराष्ट्र कृषिसेवा राजपत्रित अधिकारी संघटनेचे जे. जी. कवडे, सूर्यकांत मोरे, कृषिसेवा वर्ग दोनच्या राजपत्रित अधिकारी कल्याणकारी संघटनेच्या मनिषा मिसाळ, जिल्हा परिषद राजपत्रित कृषी अधिकारी संघटनेचे उमेश काटे, हनुमंत गावडे, कृषी पर्यवेक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष संजय पाटील, कृषी सहायक संघटनेचे एन. पी. आगलावे, शिवाजी सुरवसे, आनंद मोहिते, एस. बी. माने या वेळी उपस्थित होते.

शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने एका उच्च अधिकाऱ्याला असे धमकावणे योग्य नाही,

अलीकडे अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. त्यासाठी शासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com