Sugarcane Rate : सोलापुरात ऊसदरासाठी आंदोलनाची पुन्हा धग

कोर्टी, भंडीशेगावात टायर जाळले; आज ठिय्या
 Sugarcane Rate
Sugarcane RateAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

सोलापूर ः ऊसदराच्या (Sugarcane Rate) प्रश्नावर साखर कारखानदार वा प्रशासन कोणीच दाद देत नसल्याने ऊसदर संघर्ष समितीने आंदोलनाची धार कायम ठेवली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता.४) पुन्हा वेगवेगळ्या भागात ट्रॅक्टरचे टायर्स फोडणे, जाळणे असे प्रकार सुरुच राहिले. ‘‘आज (ता. ५) जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या चेअरमनच्या घरासमोर ठिय्या देण्यात येणार आहे,’’ असे ऊसदर संघर्ष समितीचे सचिन पाटील, दीपक भोसले यांनी सांगितले.

 Sugarcane Rate
Weed Crop : तणनियंत्रणासाठी सोपे अवजार, गवत तलवार

गेल्या आठवड्यापासून ऊसदराचे हे आंदोलन सुरु आहे. उसाला पहिली उचल २५०० रुपये आणि अंतिम ऊसबिल ३१०० रुपये देण्याची ऊसदर संघर्ष समितीची मागणी आहे. गुरुवारी (ता.३) रात्री पंढरपूर-कराड रस्त्यावर कोर्टीनजीक रस्त्यावरच टायर जाळण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी (ता.४) पुन्हा समितीने आंदोलनाची धार कायम ठेवली. भंडीशेगाव नजीक ट्रॅक्टरचे टायर फोडले. आलेगाव (ता. माढा) येथील कारखान्याकडे जाणाऱ्या काही ट्रॅक्टरचेही टायर फोडले. समितीचे दीपक भोसले म्हणाले, ‘‘मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत देत आहोत. त्यानंतर तीव्र आंदोलन करू. ’’

 Sugarcane Rate
Agriculture Drone : सुधागडात ड्रोनमार्फत खते फवारणीचे प्रात्यक्षिक

उपमुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष

ऊसदर संघर्ष समितीने एकीकडे हे आंदोलन सुरू केले असताना, कार्तिकीवारीसाठी पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऊसदर संघर्ष समितीचे दीपक भोसले, माउली हळणवर, सचिन पाटील, माउली जवळगेकर, तानाजी बागल, समाधान फाटे आदींनी भेट घेतली. त्यांना निवेदन देत ऊसदराच्या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली. त्याशिवाय अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त फळबागांना मदत करावी, शेतीपंपांचे वीजबिल पूर्ण माफ करावे, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, यांसारख्या मागण्याही करण्यात आल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com