Electricity : वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन

दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे पूर्वकल्पना न देता वीजपुरवठा खंडित केला आहे. शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. २१) महावितरणचे कनिष्ठ अभियंता पी. एन. पिसाळ यांना देण्यात आले.
Electricity
ElectricityAgrowon

यवत : दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे पूर्वकल्पना न देता वीजपुरवठा (Electricity)खंडित केला आहे. शेतकरी (Farmer) संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. २१) महावितरणचे कनिष्ठ अभियंता पी. एन. पिसाळ यांना देण्यात आले. दोन दिवसांत वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

दौंडच्या पश्‍चिम भागातील यवत, पिंपळगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

काही शेतकऱ्यांनी वीजबिल भरले असतानादेखील त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात केला आहे. याबाबत लवकर योग्य तो निर्णय न झाल्यास पुढील दोन दिवसांत शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे देखील निवेदनात नमूद केले आहे.

Electricity
पावसासाठी El Nino आणि La Nina या दोन प्रक्रियाचं महत्त्व का आहे ? | ॲग्रोवन

निवेदन देताना शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील नातू, तालुका कार्याध्यक्ष महेश थोरात, राजेंद्र शिंदे, राम गाडेकर, राजेंद्र दिवेकर, नितीन जावळे, विष्णू जगताप, नितीन जगताप, मच्छिंद्र शिंदे, ब्रह्मानंद मापारे, महेश शिंदे, अनिल फरगडे, हरी विश्वासे, दीपक कापरे, तसेच इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com