किसान सभेकडून ३१ जुलैला आंदोलन

अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदी-नाल्या लगतची शेती खरडून गेली आहे. आसमानी आणि सुलतानी संकटात शेतकरी सापडले असताना अजूनही प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाले नाहीत.
Extremely Heavy Rain
Extremely Heavy RainAgrowon

अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage Due To Heavy Rain) झाले आहे. नदी-नाल्या लगतची शेती खरडून (Land Damage) गेली आहे. आसमानी आणि सुलतानी संकटात शेतकरी सापडले असताना अजूनही प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाले नाहीत. यामुळे अतिवृष्टिग्रस्तांची भरपाई, वन जमीन, घरकुल, रस्ते मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेने (Kisan Sabha) ३१ जुलै रोजी जिल्हाभर आंदोलनाची हाक दिली आहे.

Extremely Heavy Rain
अडीच महिन्यांनी पीक नुकसान काय पाहणार?

इस्लापूर येथे हुतात्मा स्मारक भवनात किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. शंकर सिडाम यांच्या अध्यक्षतेखाली आणि कॉ. अर्जुन आडे यांच्या प्रमुख उपस्थित किसान सभेचा जिल्हा शेतकरी मेळावा झाला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या मंडळांत पावसाने नवा विक्रम संपादन केला आहे. संपूर्ण शेती पिकांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. असे असताना राज्य शासनाकडून तातडीने मदत जाहीर करण्याची गरज होती. परंतु शासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा सूर या मेळाव्यातून निघाला.

Extremely Heavy Rain
राज्यात पीक नुकसान ४५ लाख हेक्टरच्या पुढे

शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तातडीने ५० हजार हेक्टरी मदत जाहीर करा या प्रमुख मागणीसह, अतिवृष्टीने अनेक घरांची झालेली पडझड, जनावरे दगावली त्याची नुकसान भरपाई, वन जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांना वन अधिकार कायद्याची ठोस अंमलबजावणी करा, गावागावांत वंचित राहिलेल्या गरजूंना पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करा तथा घरकुलाची अनुदान रक्कम ५ लाखपर्यंत करा, गावाला जोडणारी बांधकाम विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत येणारी सर्व रस्ते, पुले तातडीने बांधा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून हमी भावाचा केद्रींय कायदा करा या मागण्यासाठी जिल्हाभरात ३१ जुलै रोजी जोरदार आंदोलन करण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला. अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने शेतकऱ्यांना जाहीर न केल्यास हजारो शेतकऱ्यांना घेऊन जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा कॉ. अर्जुन आडे यांनी दिला.

या वेळी शंकर सिडाम, तुकाराम व्यवहारे, तानाजी राठोड, अनिल आडे, शेषराव ढोले, खंडेराव कानडे, नारायण वानोळे, कोंडबाराव खोकले, अडेलु बोनगीर, मारोती फोले, आनंद लव्हाळे, राम कंडले, किशन देशमुख, दिलीप तुमलवाड, शिवाजी किरवले, अंबर चव्हाण, यंशवंत राठोड, स्टॅलिन आडे, गंगाराम गाडेकर, साईनाथ राठोड, अजय आडे, सिनू हळदे, अरुण चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com