बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि मॅग्नेट सोसायटीत करार

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) हा अशियन डेव्हलपमेंट बँक आर्थिक साह्यित राज्य शासनाचा पथदर्शी प्रकल्प नुकताच महाराष्ट्रात सुरू झाला आहे. या प्रकल्पांतर्गत कृषी विज्ञान केंद्र बारामतीची ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून निवड करण्यात आली.
ADT Baramati
ADT BaramatiAgrowon

बारामती : बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (Agriculture Development Trust) संचलित कृषी विज्ञान केंद्र (KVK Baramati) आणि मॅग्नेट सोसायटी (Magnet Society) यांच्यामध्ये शेतीमालाचे मूल्यवर्धन (Agriculture Value Chain) आणि शेतकरी मार्गदर्शन यासाठी मंगळवारी (ता. १८) सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी मॅग्नेट सोसायटीचे प्रकल्प संचालक दीपक शिंदे आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी स्वाक्षरी केली.

विज्ञान केंद्रामध्ये भेंडी व मिरची पिकासाठी उत्कृष्ट कृषी पद्धती याविषयावर प्रशिक्षण प्रसंगी हा करार करण्यात आला. या वेळी आशियायी विकास बँकेचे ग्रामीण विकास तज्ज्ञ मासिहिरो निशिमुरा, नैसर्गिक संसाधने व कृषी तज्ज्ञ मिशिगो कातागामी, पर्यावरण तज्ज्ञ ब्र्यान्डो एंगल्स, प्रकल्प विश्‍लेषक राघवेंद्र नादुविनामनी, मॅग्नेट सोसायटीच्या सहायक व्यवस्थापक डॉ. आश्‍विनी दरेकर, प्रकल्प अधिकारी संपत यादव, रावसाहेब बेंद्रे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख धीरज शिंदे, संतोष गोडसे, आशिष भोसले यांच्या महिला उपस्थित होत्या.

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) हा अशियन डेव्हलपमेंट बँक आर्थिक साह्यित राज्य शासनाचा पथदर्शी प्रकल्प नुकताच महाराष्ट्रात सुरू झाला आहे. या प्रकल्पांतर्गत कृषी विज्ञान केंद्र बारामतीची ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून निवड करण्यात आली. शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान थेट बांधावर पोचविण्यासाठी आणि काढणीपश्‍चात होणारे नुकसान टाळून शेतीमालाला अधिकचा बाजारभाव मिळवून देण्यासाठी शेतीमालाच्या मूल्यवर्धनाबाबतचा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ करार करण्यात आला.

ADT Baramati
बारामती कृषी महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

मॅग्नेट सोबतच्या झालेल्या करारामुळे शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील तज्ज्ञांमार्फत चांगल्या कृषी पद्धतीवर अवलंबित उत्पादन तंत्रज्ञान, काढणीपश्‍चात हाताळणी, उत्तम कृषिविषयक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी फायदा होईल. बाजार पेठेतील उत्पादन आणि उत्पादकता, नवीन तंत्रज्ञान, क्षेत्र भेटी, प्रात्यक्षिकांमुळे शेतकऱ्यांची क्षमता वाढविण्यास मदत होईल.

दीपक शिंदे म्हणाले, की विविध नवीन तंत्रज्ञान, क्षेत्र भेटी, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिकांमुळे शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होईल. या कारणाने शेती मधील उत्पादकतेमध्ये १५-२० टक्के नक्कीच वाढ होईल. कृषी विज्ञान केंद्र, बारामतीसारख्या शेती तंत्रज्ञान विकासात अग्रणी संस्थेबरोबर करार करून मॅग्नेट सोसायटीसुद्धा शेती क्षेत्रातही विकास करण्यास कटिबद्ध आहोत.

ADT Baramati
Pearl Millet : परतीच्या पावसाने बाजरीचे बारामती भागांत नुकसान

नीलेश नलावडे म्हणाले, की मॅग्नेट सोसायटी आणि कृषी विज्ञान केंद्राचा शेती क्षेत्रातील अनुभव व कार्य देशातील शेतकऱ्यांना या सामंजस्य कराराने शेतीविषयक ज्ञानाचे नवीन दालन उघडेल आणि महाराष्ट्रातील प्रगत शेतीची गाथा सर्व देशात पोहोचेल. तसेच हवामान बदलाने येणाऱ्या काळातील शेती अजून बिकट होत जाईल आणि त्यासाठी आपले शेतकरी तयार राहावेत, यासाठी या दोन्ही संस्था प्रयत्न करतील. मॅग्नेटअंतर्गत बचत गट, शेतकरी उत्पादन कंपनी आणि विपणनविषयक क्षमताचा विकास यांना तांत्रिक मार्गदर्शन करून त्यांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.

मॅग्नेट प्रकल्पाचे समन्वयक डॉ. मिलिंद जोशी म्हणाले, की या प्रकल्पाद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्यांना उती संवर्धन प्रयोगशाळा उभारणी, नवीन वाण प्रचलित करणे, क्षमता बांधणी प्रशिक्षणे, प्रात्याक्षिके, मूल्य साखळीचे तंत्रज्ञान, इ. साठी अनुदान देय आहे. पर्यावरणाचा समतोल राखून प्रगत तंत्रज्ञानाद्वारे पीक उत्पादन कसे घ्यावे. यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्लीमार्फत तयार केलेली नियमावली भारतातील सर्व राज्यांत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.

करारामुळे विज्ञान केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ असून, निवडलेल्या केळी, पेरू, सफरचंद, संत्री, डाळिंब, चिकू, स्ट्रॅाबेरी, गोड संत्री, हिरवी व लाल मिरची भेंडी आणि फुलझाडे अशा पिकांवर लक्ष अधिक केंद्रित करता येणार आहे. याचा फायदा प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी होणार आहे.
राजेंद्र पवार, अध्यक्ष, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com